RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

अखेर ठरलं! ह्याच अधिवेशनात मिळणार मिस्टर रामराजेंना ‘नारळ’

19 June 2019 at 02:45

माजी सभापती दिवंगत आमदार शिवाजीराव देशमुखांवर झालेल्या अन्यायाचा वचपा भाजपा काढणार !

सातारा : विधान परिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांना ह्याच अधिवेशनात ‘नारळ’ मिळणार असून रामराजेंनी विधान परिषद सभापती पदी बसल्यानंतर अनेक भानगडी केल्या होत्या. मात्र, राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवारांच्या छत्रछायेमुळे मिस्टर रामराजेंना अभय मिळत होते. मात्र, सभापती विरोधकांना झुकते माप देत असल्याचा आरोप करीत ना. चंद्रकांत पाटील संतप्त झाले होते. त्यामुळे मिस्टर रामराजेंवर याच अधिवेशनात अविश्‍वास ठराव मांडण्यात येणार असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.

25 मार्च 2015 रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने आपलाच मित्रपक्ष अर्थात राष्ट्रीय कॉंग्रेसचे विधान परिषदेचे तत्कालीन सभापती दिवंगत आमदार शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात अविश्‍वासाचा ठराव मंजूर केला होता. विधान परिषदेतील राष्ट्रवादीच्या असणार्‍या वरचढ संख्याबळामुळे कॉंग्रेसने शरणागती पत्करत राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांना विधान परिषदेच्या सभापतीपदी बसविले होते. राज्यात भाजपा-शिवसेनेची सत्ता असल्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीची गोची झाली होती. मात्र, विधान परिषदेचे सर्वोच्च सभागृह ताब्यात असल्यामुळे राष्ट्रवादीनेही आजवर भरपूर गमजा मारल्या. परंतू याला गाड, त्याला पाड अशी पॉलिसी वापरुन शरद पवारांनी आपले इप्सित साध्य केले. राज्याच्या राजकारणात जंटलमॅन म्हणून परिचित असणार्‍या शिवाजीराव देशमुखांवर राज्याच्या इतिहासातील दुसरा अविश्‍वास ठराव मंजूर करुन शरद पवारांनी रामराजेंचे पुनर्वसन जरुर केले. परंतू हेच मिस्टर रामराजे आता राष्ट्रवादीच्या मुळावर उठलेले आहेत. ‘जल बिन मछली’ तसे ‘सत्ता बिन रामराजे’, अशी अवस्था सध्या त्यांची झालेली आहे. 

माढ्याचे नवनियुक्त खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, सातार्‍याचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले आणि माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी परवा सातार्‍यात पत्रकार परिषद घेवून मिस्टर रामराजेंच्या अक्षरश: चिंध्या केल्या होत्या. परंतू ‘पादर्‍याला पावट्याचे निमित्त’ साधत रामराजेंनी थेट ज्या शरद पवारांनी रामराजेंना राजकारणात चांगले दिवस दाखवले, त्याच शरद पवारांना पक्षांतराचा अल्टिमेटम दिला. परंतू शरद पवार आपल्यासाठी किती झटले, याचा लवलेशही त्यांच्या चेहर्‍यावर दिसला नाही. रामराजे सत्तेसाठी काहीही करु शकतात, असे खा. उदयनराजे काही दिवसांपूर्वी बोलले होते, हे अक्षरश: खरे ठरु लागले आहे. मात्र, रामराजेंच्या या खेळीला मात्र राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सुरुंग लावलेला आहे. कालपासून राज्याचे अधिवेशन सुरु झाले आहे. आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पीय तरतूदही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्विटर हँडल वरुन व्हायरल झाल्यामुळे विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ निर्माण झाला होता. त्यामुळे विरोधकांनी थेट अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. परंतू विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विरोधकांना झुकते माप देऊन सभागृह तहकूब केल्यामुळे रामराजे हे सर्वोच्च सभागृहाचे सभापती असूनही विरोधकांना झुकते माप देताहेत, असा आरोप करुन ना. चंद्रकांत पाटील यांनी रामराजेंच्या विरोधात अविश्‍वास ठराव मांडणार असल्याचे जाहीर केले आहे. 

फडणवीस सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असले तरी, सभापती मिस्टर रामराजेंचेही हे शेवटचे अधिवेशन असणार आहे. पीठासीन अधिकार्‍यांविरोधात अविश्‍वास ठराव मंजूर होण्याची राज्याच्या इतिहासातील ही तिसरी घटना ठरणार आहे. 5 एप्रिल 1979 रोजी विधान परिषदेचे तत्कालीन सभापती गजाननराव गरुड यांच्या विरोधातील अविश्‍वास ठराव 183 विरुद्ध 0 मतांनी मंजूर झाला होता. त्यानंतर विधान परिषदेचे तत्कालीन सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातील अविश्‍वास ठराव दि. 17 मार्च 2015 रोजी मंजूर करण्यात आला होता. राज्याच्या इतिहासातील ऐतिहासिक असा ठरणारा अविश्‍वास ठराव रामराजेंच्या निमित्ताने येत्या काही दिवसांत होणार आहे. त्याला भाजप-शिवसेनेसह इतर मित्रपक्षांनीही दुजोरा दिला आहे. मित्रपक्ष असतानाही राष्ट्रवादी पार्टीने कॉंग्रेसचा विश्‍वासघात केला होता. दिवंगत शिवाजीराव देशमुखांसारख्या अजातशत्रू व्यक्तिमत्वाला अस्मान दाखवून रामराजेंसारख्याला विधान परिषदेसारख्या सर्वोच्च पदावर बसविण्याचे पाप राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवारांनी केले होते. परंतू काळ हा कोणाचाही नसतो, तो सर्वांचा हिशोब ठेवत असतो. काळाने राष्ट्रवादी, मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांचाही हिशोब तंतोतंत ठेवलेला आहे. 

आपले सभापती जाणार, याची पुरेपूर कल्पना आल्यामुळे मिस्टर रामराजेंनी पक्षांतराचा कार्यक्रम सुनियोजित आखलेला आहे. ज्या पवारांनी पसा-पसा भरुन दिले, त्याच पवारांवर पाय वर करुन मिस्टर रामराजे खा. उदयनराजे, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. जयकुमार गोरे या त्रिकुटांचा ‘वास्ता’ देत शिवसेनेच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा जिल्ह्यामध्ये आहे. परंतू गेल्या आठवड्यात ‘सातारा टुडे’ने केलेल्या अडकित्त्याच्या भविष्यवाणीमुळे मिस्टर रामराजेंचे शिवसेनेतील भविष्यही खडतर आहे. पद वाचविण्यासाठी मिस्टर रामराजे शिवसेनेत जातीलही, परंतू त्याठिकाणीही बरेचसे ‘अतृप्त’ बसल्यामुळे मिस्टर रामराजेंची डाळ किती शिजेल, हे येणारा काळच ठरवेल. मात्र या अधिवेशनात मिस्टर रामराजेंना ‘नारळ’ मिळणार, हे फिक्स आहे, बाकी माजी सभापती दिवंगत आमदार शिवाजीराव देशमुखांवर झालेल्या अन्यायाचा वचपा भाजपा निश्‍चित काढणार, याबाबत कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नसावी.

- संग्राम निकाळजे


vision

Dusry pan batmya det ja ekach mansasathi kadlay kay news page


राजा ढाले : तत्त्वनिष्ठेच्या नभांगणातला अढळ ध्रुवतारा

राजा ढाले ! फक्त चार अक्षरी नाव ! पण या नावाने गेली चारपाच दशके, किंबहुना त्याहून अधिक काळ महाराष्ट्राच्या समाजजीवनात विधायक स्वरुपाचा हलकल्लोळ माजवला होता.

17 July 2019 at 03:48