02:50am | Sep 20, 2019 |
कराड : मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमादरम्यान कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील मलकापूर शहरात मतदार यादीमध्ये ऑनलाईन दाखल अर्जांची पडताळणी न करता बोगस नावांचा समावेश झाला आहे. बीएलओंकडून पडताळणी व प्रत्यक्ष कागदपत्रांची तपासणी न झालेली नावे मतदार यादीतून वगळण्यात यावीत, अशी मागणी करत कराड दक्षिण कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याबाबतचे निवेदन तहसिलदार अमरदीप वाकडे यांना दिले आहे.
विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने विधानसभा मतदार यांदी पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यासाठी दि. 20,21,27 व 28 जुलै 2019 या तारखा निश्चित केल्या होत्या. दि.1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर मतदार यादी विधानसभेसाठी गृहित धरणेेत येणार होती.
परंतु, मलकापूर शहरातील पुरवणी यादीमध्ये नावे समावेश करताना नव्याने समावेश करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये बीएलओ मार्फत मतदान नोंदणीसाठी आलेले अर्ज व प्रत्यक्ष मतदार यादीमध्ये आलेली नावे यामध्ये तफावत दिसून येत आहे. तसेच ऑनलाईन मतदान नाव नोंदणीसाठी आलेल्या अर्जांची पडताळणी बीएलओ मार्फत होणे गरजेचे आहे. एकुण बीएलओकडे आलेल्या अर्जांची नोटीस काढून पडताळणी करण्यात आलेली आहे. परंतू, बीएलओचे व्यतिरिक्त जे थेट अर्ज सादर झाले त्याची पडताळणी बीएलओ मार्फत झालेली दिसुन येत नाही. यामध्ये बरीच नावे नियमाप्रमाणे आवश्यक असणारी कागदपत्रे न जोडतासुध्दा यादीमध्ये समाविष्ट झालेली आहेत. त्याचबरोबर त्याची माहिती बीएलओ/बीएलए यांना न देता परस्पर निवडणूक शाखेमध्ये निर्णय घेऊन समाविष्ट करण्यात आलेचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
तरी मलकापूर शहरातील नवीन पुरवणी मतदान यादीमध्ये बीएलओ मार्फत पडताळणी व प्रत्यक्ष कागदपत्रांची तपासणी न करता मतदार यादीमध्ये नाव नोंद झालेल्या मतदारांची नावे आपले स्तरावरून चौकशी होऊन वगळण्यात यावीत. अशी मागणी करत कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यानी तहसिलदारांना निवेदन दिले.
निवेदनावर मनोहर शिंदे यांच्यासह नगराध्यक्षा सौ.निलम येडगे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नानासो रैनाक, योगेश शिंदे, अभिजीत शिंदे, अजय शिंगाडे यांच्या सहया आहेत.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |