कर्वे समाज सेवा संस्था येथे मानसिक आरोग्यावरील केंद्र चालविले जाते तसेच येथे मानसिक आरोग्यावर अभ्यासक्रम देखील चालविण्यात येतो.
सध्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर समाजातील मानसिक विकार वाढीस लागले आहेत. याचा विचार करुन संस्थेचे विश्वस्त मधुकर पाठक व विश्वस्त संदीप खर्डेकर यांनी प्रभारी संचालक डॉ महेश ठाकूर, केंद्राचे समन्वयक प्रा. चेतन दिवाण, व अन्य प्राध्यपकांशी चर्चा केली व सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेतून ऑनलाईन समुपदेशन केंद्र चालविण्याचा निर्धार केला आहे, ह्या संदर्भात हेल्पलाईन देखील, राज्य सरकार च्या माध्यमातून सुरु केली आहे.
या आठवड्यात दोन ज्येष्ठांनी कोरोना च्या भीतीने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले असून अनेक नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. एकटेपणा, अफवांचे पीक आणि अपुऱ्या माहितीमुळे नैराश्य आणि भयगंड वाढत असून अश्या नागरिकांना आधाराची गरज असल्याचे लक्षात आले असे संस्थेचे विश्वस्त संदीप खर्डेकर यांनी सांगितले.
यासाठी कर्वे संस्थेचे मानसोपचारतज्ञ मोबाईल वरुन किंवा ऑनलाईन माध्यमातून समुपदेशन करणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन ही संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
यासाठी नागरिकांनी खालील क्रमांकावर संपर्क करावा किंवा इ मेल केल्यास त्यांना संपर्क करण्यात येइल. संपर्क करणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल असे ही समन्वयक चेतन दिवाण यांनी स्पष्ट केले आहे.
या कसौटीच्या काळात सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेतून कर्वे समाज सेवा संस्था अनेक उपक्रम राबवत असून डॉ. महेश ठाकूर, प्रसाद कोल्हटकर, वैजिनाथ बिराजदार, बालाजी तेलकर व सचिव शिवकुमार मदिराला यांच्या समितीच्या माध्यमातून सम्राट अशोक विद्यालय कर्वेनगर व*अनुसुयाताई खिलारे शाळेत पुणे मनपा ने सुरु केलेल्या निवारा केंद्रातील गरजूंना रोज चहा नाश्ता व दोन वेळ चे जेवण देण्यात येते आहे, असे संस्थेचे विश्वस्त मधुकर पाठक यांनी स्पष्ट केले आहे.
मानसिक आरोग्यविषयक केंद्राचे
समुपदेशक व त्यांचा संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे -
कर्वे समाज सेवा संस्था.
१) प्रा. चेतन दिवाण, Mob- 9850328350
२) डॉ. संजय कुमावत, Mob-09821066077
3) डॉ. प्रवीण पारगावकर, Mob- 09604552698
4) डॉ. कल्याणी तळवेलकर, Mob-09820714876
5) डॉ. स्नेहा मुलचंदानी, Mob- 09881687454
हे समुपदेशनासाठी उपलब्ध असणार आहेत. तसेच खालील मेल आय डी वर ही संपर्क करता येइल ...
kinsspune.pgdcmh@gmail.com
संदीप खर्डेकर
विश्वस्त - कर्वे समाज सेवा संस्था.
मो - ९८५०९९९९९५
kinsspune.pgdcmh@gmail.com
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |