RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

पालिका मुख्याधिकारी शंकर गोरेंना पोलीस अधीक्षक देशमुख यांची नोटीस

11 September 2018 at 20:15

पालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास मुख्याधिकारी जबाबदार

सातारा : नगरपालिका मुख्याधिकारी शंकर गोरे यांना पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी नोटीस बजावली असून यामुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

गणेशोत्सवाला कालावधी कमी राहिला आहे. त्यातच नगरपालिकेचा भोंगळ कारभार जगजाहीर आहे. अद्यापही गणेश विसर्जन मिरवणुक मार्ग व स्थळे निश्चित केली गेली नाहीत. त्यामुळे जनतेत संभ्रम, असंतोष व अनिश्चितेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी विसर्जन मिरवणुक मार्ग व स्थळे याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा. न घेतल्यास निर्णयाची व्यापक प्रसिध्दी देऊन नागरिकांमधील संभ्रमावस्था दूर करावी. आपण तात्काळ निर्णय जाहीर केला नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पालिका प्रशासनाचे मुख्याधिकारी म्हणून जबाबदार धरले जाईल, अशी नोटीस सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी बाजवल्याने पालिका प्रशासनाची धावपळ उडाली आहे.

'पिटबुल' चोरणारे दोन अल्पवयीन ताब्यात

येथील गोडोली परिसरातून पिटबुल या अमेरिकन ब्रीडचे साठ हजार रुपये किमतीचे श्वान चोरीला गेले होते .

28 minutes before

स्वाईन फ्ल्यूचा आणखी एक बळी

सातारा शहर व परिसरात स्वाईन फ्ल्यूचा विळखा वाढला आहे. महिन्याभराच्या कालावधीत स्वाईन फ्ल्यूचे 10 बळी गेल्यानंतरही आरोग्य यंत्रणा सुस्त आहे.

36 minutes before

वाठारकर व सुर्यवंशी यांनी केला २५० कोंटीचा अपहार : याचिकाकर्ते राजेंद्र पाटील यांचा आरोप

कराड जनता बँकेतील संचालक मंडळाच्या भ्रष्ट कारभारामुळे बँकिंग क्षेत्रातील कराडची विश्वासहर्ता संपली आहे. बँकेच्या नावात कराड असल्यामुळे अनेक आर्थिक संस्थांमधील आपल्या ठेवी काढून घेऊ लागले आहेत.

45 minutes before

गणेश विसर्जन पार्श्वभूमीवर सुरुची राडा प्रकरणातील आजी-माजी नगरसेवकांसह १७३ जण हद्दपार

173 संशयितांना गणेशोसत्व होईपर्यंत सातारा तालुक्‍यातून हद्दपार केले आहे.

16 hours before