02:15am | Mar 31, 2019 |
कराड : सातारा जिल्हय़ातून एक वर्षासाठी तडीपार केलेले दोघेजण कार्वे ता. कराड येथे फिरताना पोलिसांच्या जाळय़ात अडकले. कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने दोघांना अटक केली. सागर तुकाराम हुलवान (वय 23 रा. कार्वे ता. कराड), विशाल सदाशिव हुलवान (वय 24 रा. कार्वे ता. कराड) अशी दोघांची नावे आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा जिल्हय़ातील फरारी संशयितांचा शोध घेण्यासाठी कराड ग्रामीणच्या पोलिसांनी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान सातारा जिल्हय़ातून एक वर्षासाठी तडीपार केलेले दोघेजण कार्वे गावच्या हद्दीत मोकाट वावरत असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे चंद्रकांत माळी यांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली माळी यांच्यासह शशिकांत काळे, सज्जन जगताप, शशिकांत घाडगे, अमित पवार यांचे पथक कार्वे परिसरात संशयितांचा शोध घेत होते. त्यावेळी कार्वे कोडोली रस्त्यावर सागर हुलवान हा फिरत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर दुसरा विशाल हुलवान हा अहिल्यानगर येथे वावरताना पोलिसांच्या जाळय़ात अडकला. दोघांनाही सातारा जिल्हय़ातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. तडीपार असतानाही ते आदेशाचे उल्लंघन करून कार्वे येथे वावरत होते. पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांनी कारवाईबाबत कर्मचाऱयांचे अभिनंदन केले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |