01:53am | Sep 09, 2018 |
कराड : कराड-तासगाव रोडवरील वडगाव हवेली (ता.कराड)येथील इसार पेट्रोल पंपाजवळ विशेष पोलीस पथकाने वाघनखे म्हणून जंगली हिस्त्र प्राण्यांच्या नख्या विकणारी टोळी गजाआड केली आहे. ही कारवाई गुरूवारी करण्यात आली.
याप्रकरणी अवधूत जगदीश जगताप (रा.खुबी ता.कराड) व एक विधीसंघर्षग्रस्त बालक अशी दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी,कराड-तासगाव रोडवर वडगाव हवेली गावच्या हद्दीतील इसार पेट्रोल पंपाजवळ अवधूत जगताप व एक विधीसंघर्षग्रस्त बालक हे दोघेजण वाघाची नखे विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या विशेष पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक भापकर यांनी पोलीस पथक व वनविभागाच्या कर्मचार्यांच्या मदतीने शुक्रवारी या पेट्रोल पंपाजवळ सापळा रचला. त्यावेळी हे दोघेजण विशेष पोलीस पथकाच्या जाळयात सापडले. त्यांच्याकडून जंगली हिस्त्र प्राण्याच्या दोन नख्या, एक चाकू, मोटारसायकल असा एकूण ऐंशी हजाराचा माल जप्त करण्यात आला. त्यानंतर त्यांना पुढील कारवाईसाठी कराड तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भापकर, पो.ह. जगदाळे, पो.ना. पवार, जमादार, चव्हाण पो.कॉ. पाटील, बर्गे, कांबळे, देशमुख, बरकडे यांनी केली.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |