RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

कच्चा लिंबू ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

16 April 2018 at 15:08

नवी दिल्ली : संपूर्ण भारतीय कलाविश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या मानाच्या ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा दिल्लीच्या शास्त्री भवनातील पीआयबी कॉन्फरन्स रुम येथून करण्यात आली. चित्रपट क्षेत्रातील विविध विभागांसाठी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यासाठी नेमण्यात आलेल्या परिक्षकांच्या ज्युरीचे नेतृत्व दिग्दर्शक शेखर कपूर यांनी केले होते.

६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांच्या खात्यातही काही पुरस्कार आले आहेत. मृत्यूभोग या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर, सुयश शिंदेच्या मयतला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सर्वोत्कष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार प्रसाद ओकच्या कच्चा लिंबू या चित्रपटाला जाहीर झाला आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि रवी जाधव यांच्या भूमिका असणा-या या चित्रपटाने प्रेक्षकांसोबतच राष्ट्रीय पुरस्कारांच्या ज्युरींचीही मने जिंकली असे म्हणायला हरकत नाही.

तर मराठमोळा निर्माता अमित मसुरकर यांचा न्यूटन हा हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. याच चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेते पंकज त्रिपाठी यांनाही राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे.

म्होरक्या या मराठी चित्रपटाला विशेष कामगिरी पुरस्कार मिळाला आहे. सुयश शिंदे दिग्दर्शित मयत या शॉर्ट फिल्मला सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. नागराज मंजुळेंच्या पावसाचा निबंध या लघुपटाचा यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे. ३ मे २०१८ रोजी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.