RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

माजी आ. दिलीप येळगांवकरांनी महाराष्ट्रातील जनतेची नाक घासून माफी मागावी

09 October 2018 at 18:24

श्रीमंत कोकाटे : भाजपने येळगावकरांची तत्काळ हकालपट्टी करण्याची मागणी

सातारा : राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांची बदनामी करणार्‍या नालायक जेम्स लेनचे प्रकरण क्षुल्लक आहे, असे काल झालेल्या पत्रकार परिषदेत वक्तव्य करणार्‍या माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर यांचा शेलक्या भाषेत समाचार घेत संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे यांनी डॉ. येळगावकर यांची भाजपमधून हकालपट्टी करावी तसेच डॉ. येळगावकरांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची नाक घासून माफी मागावी, अशी मागणी श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केली.

काल दि. 8 रोजी माजी आ. तथा भाजप नेते डॉ. दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषद घेवून सातार्‍याचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपमधून निवडणूक लढवावी, असे आवाहन केले होते. ज्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने खा. उदयनराजेंना झुलवत ठेवले आहे, अशा पक्षात उदयनराजेंनी थांबू नये. खा. उदयनराजे स्वाभिमानी आहेत. ते भाजपमध्ये आल्यास त्यांचा सन्मान केला जाईल, असे आवाहन केले होते. तसेच जेम्स लेनबाबत बोलताना पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी विचारांची लढाई विचारांनी होईल, असे सांगितले होते. मात्र अशा क्षुल्लक कारणावरुन उदयनराजेंनी भाजपचा राजीनामा दिला. मात्र जेम्स लेन प्रकरणाचे मी समर्थन करीत नाही. उदयनराजेंना राजीनामा न देताही संबंधित पुस्तकावर बंदी आणता आली असती. इतर मार्गाचा अवलंबही करता आला असता, असे वक्तव्य डॉ. येळगावकर यांनी काल केले होते. आज या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत समाचार घेतला. ज्या जेम्स लेनने राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केली, त्या जेम्स लेनचे प्रकरण क्षुल्लक, असे वक्तव्य करणार्‍या डॉ. येळगावकर यांचा आम्ही निषेध करतो. त्यांनी शिवतीर्थावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर येवून नाक घासून महाराष्ट्रातील समस्त जनतेची माफी मागावी. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी डॉ. येळगावकर यांची भाजपमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली.

रामदास माने उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित

लोधवडेचे सुपूत्र व पुणे येथील आंतरराष्ट्रीय उद्योजक रामदास मानसिंग माने यांनी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कोल्हापूर येथील समर्थ फांऊंडेशनच्या वतीने नुकताच कोल्हापूर येथे "उद्योग भूषण पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले आहे.

3 hours before

कास्ट्राईब संघटना राज्यभर आंदोलन छेडणार : अजित वाघमारे

विषयावर राज्यभर जनजागृती करुन सरकाराच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब संघटनेच्यावतीने देण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अजित वाघमारे यांनी दिली.

4 hours before

पतंग उडवताना विहिरीत पडल्याने मुलाचा बुडून मृत्यू

येथील राधिका रोडवर प्रतापसिंह शेतीफार्म नजीक असलेल्या विहरीत प्रतीक गुलाब मतकर (वय 16, रा.बुधवार) या युवकाचा रविवारी दुपारी पाण्यात बुडून मृत्यू झाला.

5 hours before

सालपे येथील वृद्धेच्या खुनाचा अखेर दीड महिन्यानंतर छडा

सालपे ता. फलटण येथे शांताबाई जयवंत खरात (वय 70) या वृध्द महिलेच्या खूनाला अखेर दीड महिन्यानंतर वाचा फुटली असून चोरीच्या उद्देशाने तो खून झाला असल्याचे समोर आला आहे.

5 hours before