12:28am | Aug 30, 2018 |
कराड : येणपे (ता.कराड) येथील विवाहीतेवर लैगिंक अत्याचार करून तिचा खून केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी उघडकीस आली असून याप्रकरणी पोलिसांनी सहा तासात एका अल्पवयीन मुलासह दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. दरम्यान,जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार,उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली.
करण शंकर कोळी (वय 22 रा. ओकोली ता. शिराळा जि.सांगली मुळ रा. साकुर्डी ता.कराड) व एक अल्पवयीन बालक असे दोघांना ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत या गुन्हयासंदर्भात माहिती दिली.ते म्हणाले, येणपे येथील सौ. सविता गणेश पाटील (वय 22) ही विवाहिता सोमवार दि.27 रोजी सायंकाळी 5.30 वाजता शेतातून बेपत्ता झाली असल्याची फिर्याद तिचा पती गणेश पांडुरंग पाटील यांनी कराड तालुका पोलिसांत दिली होती. त्यानंतर मंगळवार दि.28 रोजी दुपारी 1 च्या सुमारास सौ. सविता पाटील हिचा मृतदेह येणपे गावच्या हद्दीत शेतालगतील ओढयाजवळ असलेल्या झुडपात नग्नावस्थेत आढळून आला होता.या घटनेची माहिती येणपेचे पोलिस पाटील वैभवी कांबळे यांनी कराड तालुका पोलिस ठाण्याला दिली.त्यानुसार पोलिस निरीक्षक अशोक क्षिरसागर, सहाय्यक पोलिस निरीक्षक बी.बी.शिंदे, पोलिस उपनिरीक्षक चौधरी व पोलिस कर्मचार्यांनी घटनास्थळावर जाऊन परिस्थितीची पहाणी केली असता सौ. सविता पाटील यांचा मृतदेह झुडपात आढळून आला. व त्यांच्या अंगावरील दागिने अज्ञात चोरटयांनी बळजबरीने चोरून नेल्याचे निप्षण झाले होते. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा घटनास्थळावर पंचनामा केला.
दरम्यान, मयताची सासू सौ. विजया पांडुरंग पाटील यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. यामध्ये सौ. सविता पाटील हिच्यावर अज्ञात इसमानी लेैगिंक अत्याचार करून त्यांच्या अंगावरील 25 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने बळजबरीने चोरून नेऊन तिचा खून केला आणि मृतदेह झाडाझुडपात टाकून दिल्याचे म्हटले आहे. त्यानुसार तालुका पोलिसांनी अज्ञातावर कलम 302,376,394 प्रमाणे गुन्हा दाखल केेला. पोलिसांनी या गुन्हयाचा तपास वेगाने करीत अवघ्या सहा तासात करण कोळी याच्यासह एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात यश मिळवले.
हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिस निरीक्षक अशोक क्षिरसागर, सहाय्यक पोलिस निरीक्षक बी.बी. शिंदे, उपनिरीक्षक ए.व्ही. चौधरी, पी.के. राठोड, हवालदार महेश सपकाळ, धनजंय कोळी, रविंद्र पानवळ, शशिकांत काळे, अमित पवार, अमोल पवार, संदीप घोरपडे, विजय भोईटे, संजय काटे, विजय म्हेत्रे यांनी मोलाची कामगिरी केली
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |