कराड : शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केलेल्या दुचाकी चोरटय़ांकडून आणखी सहा चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना बुधवारी यश आले. ढेबेवाडी परिसरासह करमाळा येथून दुचाकी हस्तगत करण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान ज्यांच्या दुचाकी चोरीस गेल्या आहेत त्यांनी पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्हय़ात मिळालेल्या दुचाकी पाहण्यासाठी गर्दी केली होती.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गत चार दिवसात कराड पोलिसांनी दुचाकी चोरटय़ांना पकडण्यासाठी सापळा रचला होता. सहय़ाद्रि रूग्णालया परिसरात परिसरात काही संशयित फिरत असल्याचे पोलिसांना समजले. त्या परिसरात गस्त घालणाऱया हवालदार नितीन येळवे, हवालदार प्रदीप कदम यांना तपासणी करत असताना शशिकांत रघुनाथ कांबळे (रा. तांदूळवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) हा संशयित सापडला. त्याने पोलीस चौकशीत 17 दुचाकी चोरल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्याच्याकडून 15 दुचाकी सोमवारी हस्तगत केल्या. उर्वरीत दोन दुचाकी बुधवारी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान कृष्णा हॉस्पिटल परिसरात हवालदार राजेंद्र पुजारी आणि पोलीस नाईक संजय जाधव पेट्रोलिंग करत असताना त्यांना अमोल अधिकराव कारंडे (वय 28, रा. कुंभारगाव, ता. पाटण, जि. सातारा) याच्यासह अन्य एक अल्पवयीन मुलगा दुचाकी पळवून नेताना सापडला होता. या संशयितांकडे चौकशी करून त्यांच्या आणखी एका अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेतले. संशयितांनी 12 दुचाकी चोरल्याची कबुली दिली होती. त्यापैकी 8 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या होत्या. उर्वरीत 4 दुचाकी ढेबेवाडी परिसरातून बुधवारी पहाटे हस्तगत करण्यात आल्या. दुचाकी चोरटय़ांकडून आणखी माहिती मिळण्याची शक्यता आहे. संशयितांकडून हस्तगत करण्यात आलेल्या दुचाकी पोलीस ठाण्यात लावल्या आहेत. आत्तापर्यंत ज्यांच्या दुचाकी चोरीस गेल्या आहेत त्यांनी आपली दुचाकी मिळते का? हे पाहण्यासाठी पोलीस ठाण्यात गर्दी केली आहे. या गुन्हय़ाची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून पोलीस अजुनही संशयितांकडे कसुन चौकशी करत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |