10:35pm | May 28, 2018 |
सातारा : सातारा पालिकेच्या इतिहासात सोमवारी झालेल्या रणकंदात भाजपाच्या नगरसेवकाने मुख्याधिकाऱ्यांना दांडक्याने फोकळून तसेच बघून घेण्याची भाषा वापरली होती. त्यामुळे आजची सभा ही पालिकेच्या इतिहासात अभुतपूर्व व गोंधळाची ठरली. मुख्याधिकाऱ्यांना दांडक्याने फोकळून काढल्याच्या भाषेमुळे खा.उदयनराजेंनी सातार्यात मोगलाई नाही असा इशारा जांभळेंना दिला आहे.
शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. नागरीकांना पाणी मिळत नाही. या विषयावरून सभेचे कामकाज सत्ताधार्यांनी आटोपते घेतल्यामुळे संतापलेले भाजप नगरसेवक धंनजय जांभळे प्रथमच आक्रमक झाले. जांभळे यांनी खड्डे आणि पाणी या प्रश्नावरून पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांना धारेवर धरले. प्रभागातील खड्डे भरा, खड्यात पडून नागरीकांना दुखापती झाल्यातर सीओ साहेब तुम्हाला दांडक्याने फोकळून काढू असा दमच भरला.
दरम्यान भाजप नगरसेवक धंनजय जांभळे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पालिकेतील सर्व कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन छेडले. यावेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी कर्मचार्यांची बैठक घेवून तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. सातार्यात काय मोगलाई लागून गेली नाही असा इशारा देत कर्मचार्यांना दमदाटी करणार्या जांभळेवर गुन्हा दाखल करा अशा सुचना त्यांनी यावेळी मुख्याधिकारी शंकर गोरेंना दिल्या.
सातारा पालिकेची सर्वसाधारण सभेत विरोधकांना नगराध्यक्षा माधवी कदम यांनी बोलू न देता सर्व 1 ते 18 विषयांना मंजूरी देत सभेचे कामकाज आटोपले. सभा संपूवन बाहेर पडत असताना संतपापलेले भाजप नगरसेवक धनंजय जांभळेंनी शहरातील पाणी आणि खड्यांच्या प्रश्नावर मुख्याधिकारी शंकर गोरेंना दमच भरला. खड्यात पडून जर का? नागरीकांना दुखापती झाल्यातर तुम्हालाच दांडक्याने फोकळून काढले जाईल. या जांभळे यांच्या वक्तव्याचा पालिका कर्मचार्यांनी तीव्र शब्दात निषेध करीत कामबंद आंदोलन छेडले. सभा सुरू होण्यापुर्वीच विरोधी नगरसेवकांनी सभागृहासमोर ठिय्या आंदोलन केला. सभेत दंगा होवू नये यासाठी सत्ताधार्यांनी पोलीस बंदोबस्त मागविला होता. पालिकेत सकाळपासूनच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सकाळपासून घडलेल्या नाट्यांनतर खा. उदयनराजे भोसले यांनी पालिकेत येवून कर्मचार्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी ते म्हणाले, तुम्ही घाबरू नका, मी तुमच्याबरोबर आहे, सातार्यात काय मोगलाई लागून गेली नाही. दादागिरी करायला अक्कल लागत नाही. माझ्या सहनशिलतेचा अंत पाहू नका, माझी संहनशिलता संपली तर मी काय करेन देव जाणे. जांभळे याचे पहिले रिव्हॉल्वरचा परवाना रद्द करण्याची मागणी पालिकेने जिल्हाधिकार्यांकडे करावी. आज कर्मचार्यांना दम दिला. उद्या हा गोळ्या घालण्याची भाषा करेल. कर्मचार्यांवर सभागृहात दादागिरीची भाषा करणार्या त्या नगरसेवकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सुचना यावेळी मुख्याधिकारी गोरे व सर्व पदाधिकार्यांना दिल्या.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |