11:25pm | Nov 23, 2018 |
कराड : कराड तालुका शेती उत्पन्न बाजार समिती, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषद कृषी विभागाच्यावतीने दि.24 ते दि. 28 दरम्यान होणार्या यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या ( दि. 24 रोजी) नागरिकांसाठी प्रदर्शन खुले होणार आहे. दरम्यान, कृषी प्रदर्शनस्थळाची आज (शुक्रवारी) प्रशासनाने पहाणी करून विविध विभागांना सूचना केल्या.
यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनात यावर्षी कृषी महोत्सव होणार आहे. शासनाच्या विविध विभागांचा या प्रदर्शनात प्रत्यक्ष सहभाग असणार आहे. शासनाच्या योजनांच्या स्टॉलसह शेती औजारे, बी-बियाणे, खते यांचे सुमारे 400 स्टॉल्स आहेत. जलयुक्त शिवार, सेंद्रीय शेती, गट शेती मॉडेल्स व धान्य महोत्सव हे या प्रदर्शनाचे खास वैशिष्टय असेल. ‘पाणीदार गावांची यशोगाथा’ चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे. प्रदर्शनात पीक, फळे, भाजीपाला आदी स्पर्धा होणार असून सेंद्रीय व समूह शेतीची माहिती देणारे स्वतंत्र दालन असेल. शेतकरी व बचतगटांना यामध्ये मोफत स्टॉल देण्यात आले आहेत.
कृषी प्रदर्शनाची तयारी पूर्णत्वास आली असून उद्या दि. 24 पासून जनतेसाठी हे प्रदर्शन खुले होणार आहे. चार दिवस चालणार्या या प्रदर्शनास लाखाहून अधिक नागरिक भेट देत असतात. या पार्श्वभूमीवर प्रदर्शन स्थळाची आज (शुक्रवारी ) प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनी भेट देवून पहाणी केली. तसेच विविध विभागांचा आढावा घेवून त्यांनी योग्य त्या सूचना केल्या. यावेळी तहसीलदार राजेंद्र चव्हाण, तालुका कृषी अधिकारी डी.ए.खरात, कराड शहर पोलिस ठाण्याचे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी, सभापती मोहनराव माने, उपसभापती आत्माराम जाधव, बाजार समितीचे संचालक रामकृष्ण वेताळ, महादेव देसाई, विजय कदम, इव्हेंटस मॅनेजमेंटचे संदीप गिड्डे यांची उपस्थिती होती.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |