02:34am | Apr 19, 2018 |
सातारा : सातारा मध्यवर्ती बसस्थानकामध्ये बॅगामधून बिनधोकपणे पैशांची पाकिटे चोरी करणारी महाविद्यालयीन युवती सीसीटीव्हीत कैद झाली असून स्टँड चौकीतील पोलिसांनी तिला एका गुन्ह्यात अटक केल्याने खळबळ उडाली आहे. स्टँडमध्ये सर्वत्र सीसीटीव्ही बसवले गेल्याने ही कारवाई होण्यास मदत झाली असून ज्यांची पर्स, कागदपत्रे चोरी झाली आहेत त्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दीक्षा भोसले (लिंब गोवे ता.सातारा) असे संशयित चोरी करणार्या युवतीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, अक्षदा जाधव ही युवती तिच्या आज्जीसोबत शिवाजीनगर येथे जाण्यासाठी सातारा एसटी स्टँडवर मंगळवारी दुपारी आली होती. गर्दीच्यावेळी एसटीमध्ये जात असताना अज्ञात चोरट्याने तिची पैशाची व कागदपत्रांची पर्स चोरी केली. ही बाब अक्षदाच्या लक्षात आल्यानंतर तिने एसटी स्टँड चौकीमध्ये धाव घेतली.
चौकीतील पोलिस हवालदारांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यास सुरुवात केल्यानंतर संशयित दीक्षा भोसले हिने पर्स चोरल्याचे फुटेजमध्ये दिसले. पोलिसांनी त्या युवतीला ताब्यात घेतल्यानंतर चोरीची कबुली दिली. दरम्यान, चोरीचे आणखी असे प्रयत्न केले असून तक्रारदारांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, संशयित युवती सातारा येथे एका महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत आहे. उच्च शिक्षित युवतीकडून चोरीचे कृत्य घडल्याने त्याबाबत खळबळ उडाली आहे. पोलिस उपअधिकक्ष डॉ.खंडेराव धरणे, पोनि नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ता पवार, प्रवीण पवार, केतन शिंदे, अरुण दगडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |