11:50pm | Mar 25, 2019 |
मुंबई : सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आज मुंबई येथे संध्याकाळी भाजपात जाहीर प्रवेश केला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा झेंडा हातात देत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे भाजपमध्ये स्वागत केले. यावेळी फलटण तालुक्यातील नाईक-निंबाळकर गटाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
सुमारे चार दिवसांपूर्वी सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर जिल्हा कॉंग्रेस अध्यक्षपदाचा तसेच कॉंग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. आधीच फुटीच्या उंबरठ्यावर असलेल्या कॉंग्रेस पक्षातील रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे जिल्हा कॉंग्रेस खिळखिळी झाली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व आ. जयकुमार गोरे सोडल्यास एकही दखलपात्र चेहरा कॉंग्रेसमध्ये नाही. कॉंग्रेसचे माजी आमदार विलासराव उंडाळकर यांचे सध्या तळ्यात-मळ्यात आहे. माजी आ. मदन भोसले यांच्याबरोबरच रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे भाजपचे जिल्ह्यात वजन वाढलेले आहे. दरम्यान, माढ्यातून लोकसभेसाठी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे नाव आघाडीवर असल्यामुळे नुकतेच भाजपात डेरेदाखल झालेल्या रणजितसिंह मोहिते-पाटील यांची मात्र गोची झाली आहे.
आज संध्याकाळी मुंबई येथील नरीमन पॉंईंट येथे झालेल्या पक्ष प्रवेश समारंभात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीष महाजन, मंत्री विनोद तावडे, विजयराव देशमुख, सदाभाऊ खोत, प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह सातारा जिल्हा भाजपातील पदाधिकार्यांसह फलटण व माढा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |