RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची पूरग्रस्तांना 25 लाखांची मदत

11 August 2019 at 16:51

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला धनादेश

सातारा : माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी महाराष्ट्रात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या लोकांना मदत म्हणून 25 लाख 52 हजार 852 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे सोपवला आहे. जिल्ह्यातील इतर पुढारी राजकारण करण्यात मश्गुल असतानाच खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिलेल्या या मदतीमुळे त्यांच्या या दातृत्वाचे कौतुक केले जात आहे.

राज्यात कोल्हापूर, सातारा व सांगली सह मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांमध्ये पुराची दाहकता अधिक आहे. या पुरामुळे दोन्ही जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरात अडकलेल्या लोकांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. मात्र पूर ओसरल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी राज्य शासनावर आलेली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी त्यांच्या स्वराज इंडिया ऍग्रो लि. तर्फे 25 लाख 52 हजार 852 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे सुपूर्द केला आहे. दोन दिवसांपूर्वीच खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत फलटण तालुक्यातील सहकारी संस्थांच्यावतीने जिवनावश्यक सामग्रींसह 2 हजार ब्लँकेट कालच सांगली, कोल्हापूरकडे रवाना केले होते. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर पंढरपूर, सांगली व कोल्हापूर येथील पुरात अडकलेल्या लोकांना मदतीचे आवाहन केले होते. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 लाखांचा धनादेश देवून मदतीची सुरुवात स्वत:पासून केल्यामुळे त्यांच्या या दातृत्वाचे कौतुक केले जात आहे.

Nice decision took.great work done.really congratulations hon.ranjitsinha hindurao naik nimbalkar saheb.khaasdar madha loksabga matdaar sangh.Anup pawar


वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे आरटीओ कार्यालयासमोरच वाहतुकीचे तीन तेरा

वाहनचालकांना वाहतुकीचे नियम शिकवणार्‍या उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कार्यालयासमोरच रस्त्याच्या दुतर्फा होत असलेल्या बेकायदेशीर चारचाकी व दुचाकीच्या पार्किंगमुळे अजिंक्य हॉस्पिटल ते सैनिक स्कूल मार्गावर आरटीओ अधिकारी आणि एजंटांच्या संगनमताने

53 minutes before

जेसीबी पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

नलवडे (बिचुकले), ता. कोरेगाव येथील वाडगं तथा मोरदरा नावाच्या शेतशिवारातील जेसीबी पलटी होऊन झालेल्या अपघातात सामाजिक वनीकरण विभागाचा कंत्राटी कामगार जागीच ठार झाला.

2 hours before

फलटण येथील दत्त नगर येथे महिलेचा खून

दत्त नगर, चौधरवाडी ता. फलटण येथील हेमंत निंबाळकर यांच्या शेतातील घरात रहात असलेल्या महिलेचा अज्ञाताने खून केल्याची घटना घडली असून अरीफा रशीद शेख (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे.

14 hours before

इथिओपियाचा फिक्रू अबेरा दादी प्रथम

ढगाळ वातावरण... यवतेश्वर घाटातील धबधबे ...रस्त्यावर आलेले ढग ... अशा आल्हाददायी वातावरणात आज सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धकांमुळे येवतेश्वर घाट फुलला होता. सातारकरांनी मार्गाच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात धावपटूंचे

14 hours before