04:22pm | May 12, 2018 |
सातारा : सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात असणार्या प्रिझन वॉर्ड (आरोपी कक्ष) मध्ये दोन पोलीस कर्मचार्यांमध्ये तुंबळ फ्री स्टाईल हाणामारी झाल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सातारा जिल्हा कारागृहातील न्यायालयीन कोठडीत आजारी असलेल्या आरोपींना उपचारासाठी येथील प्रिझन वॉर्डमध्ये ठेवले जाते. याठिकाणीही पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त असतो. आज सकाळी ड्युटी बदलतेवेळी येथील बंदोबस्तासाठी असणार्या महिला पोलिसाने ड्युटीवर आलेल्या पुरुष पोलीस कर्मचार्यास वेळेत का आला नाही, असा जाब विचारला. याचा राग आल्याने त्या कर्मचार्याने महिला पोलीस कर्मचार्यास धक्काबुक्की व मारहाण केली. याची माहिती संबंधित महिला पोलीसाने तिच्या नातेवाईकांना फोनवरुन दिली. त्यानंतर आलेल्या तिच्या नातेवाईकांनी संबंधित पुरुष पोलीस कर्मचार्यास फ्रि स्टाईल हाणामारी करीत चोपून काढले. यावेळी त्या कर्मचार्याचे कपडेही फाडण्यात आले. दरम्यान, या पोलीस कर्मचार्याने मद्यपान केल्याची चर्चा सिव्हिल परिसरामध्ये ऐकावयास मिळत होती. या फ्री स्टाईल हाणामारीमुळे सिव्हिल हॉस्पिटलमधील वातावरण तणावपूर्ण बनले होते. दोघांनाही आपण फार मोठी चूक केली असल्याचे लक्षात आल्यानंतर दोघांनीही एकमेकांची माफी मागून यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रिझन वॉर्डमध्ये आज झालेल्या हाणामारीची चर्चा सर्वत्र खुमासदारपणे चर्चिली जात होती. दरम्यान या हाणामारीची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांच्यापर्यंत पोहोचली असून या दोघांवर जिल्हा पोलीस प्रमुख काय कारवाई करतात, याकडे पोलीस दलाचे लक्ष लागले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |