11:57pm | May 24, 2018 |
सातारा : सातारा येथील सायक्लो कंपनीने कामगारांचा भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) न भरता फसवणूक केल्याप्रकरणी मालक पांडूरंग शिंदेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 36 लाख 14 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे हे प्रकरण असून याप्रकरणी कोल्हापूर येथील पीपीएफच्या अधिकार्याने सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, सातार्यातील कंपनीविरुध्द गुन्हा दाखल झाल्याने कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे.
पांडूरंग रामचंद्र शिंदे, प्रमिला पांडूरंग शिंदे, राहुल पांडूरंग शिंदे (तिघे रा. राधिका रोड, सातारा) राजन दिनकर फराटे (रा. आसू ता फलटण) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी नितीन गंगाधरराव डेकाटे (रा.ताराबाई पार्क, कोल्हापूर) यांनी तक्रार दिली असून ते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे अधिकारी आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयामार्फत विविध कामे केली जातात. खासगी कंपनीच्या मालकीची व संस्था चालकाने त्यांच्या कर्मचार्यांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात करुन संबंधित रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत चलनाद्वारे जमा करणे बंधनकारक आहे. सातार्यातील सायक्लो ट्रान्समिशन लि. मौजे पाटखळ येथे कंपनी असून या कंपनीचा रजिस्टर पीएफ क्रमांकांसह त्याचे सर्व रेकॉर्डस आहेत.
भविष्य निर्वाह निधीबाबबत सायक्लो कंपनी कामगारांच्या पगारातून दरमहा 12 टक्के दराने कपात करुन ती स्टेट बँकेत भरत होती. मात्र या कंपनीने नोव्हेबर 2013 ते डिसेंबर 2017 या कालावधीत 213 कर्मचार्यांचा भविष्य निर्वाह निधी भरलेला नाही. 213 या कामगरांच्या संख्येप्रमाणे सुमारे 5 वर्षाचा कालावधी त्यानुसार संबंधित ही रक्कम 36 लाख 13 हजार 376 एवढी आहे. सायक्लोच्यावतीने पीपीएफ भरण्यापूर्वी कंपनीने मालकाबाबत व जबाबदार व्यक्तीचे नाव दिलेले आहे.
सायक्लोच्या कर्मचार्यांचा पीपीएफ भरला नसल्याची ही बाब समोर आल्यानंतर पीपीए कार्यालयाने सायक्लो कंपनीला भेट दिली होती. या भेटीत कंपनीच्या मॅनेजरला तत्काळ कामगारांच्या पीपीएफचे संबंधित पैसे भरण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र सायक्लो कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे अखेर पीपीएफ कार्यालयाच्या अधिकार्यांनी गुरुवारी सातारा तालुका पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी सायक्लो कंपनीच्या चौघांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |