12:49am | Oct 07, 2018 |
कराड : राज्यातील नगरपालिकांच्या वैशिष्टयपूर्ण कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२२ कोटी रूपयांचा निधी दिला आहे. यापैकी २ कोटी निधी कराड नगरपलिकेला देण्यात आला असून या निधीतून येथील छ. शिवाजी स्टेडिअमचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. या कामात कोणकोणत्या कामांचा समावेश असावा याकरिता तज्ञ नागरिकांची समिती गठीत करण्याचा मानस असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व विठ्ठल रूक्मिणी मंदीरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, कराड शहरासह कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या विकासकामांसाठी कठिबध्द असल्याचेही त्यांनी सांगितले.
वैशिष्टपूर्ण मंजूर कामाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप उपस्थित होते.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, राज्यातील विविध विकास कामांना चालना देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिका, नगरपालिकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. तसेच कराड शहरातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. कराड शहरातील छ. शिवाजी स्टेडिअमच्या सुशोभिकरणासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून २ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्यातील सर्व नगरपालिकांच्या वैशिष्टयपूर्ण कामांसाठी २२२ कोटी रूपये निधी दिला आहे.
ते म्हणाले, येत्या काळात कराड शहरातील विविध विकास कामांसाठी निधी मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. हा निधी जास्तीत जास्त मिळावा यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. या कामासाठी पालिकेतील सर्व पदाधिकारी नगरसेवक तसेच सर्वपक्षीय तज्ञ यांचे यांची समिती गठीत करण्याचा मानस आहे. कमिटीच्यामाध्यमातून येथे काय कामे केली पाहिजेत, कशाला प्राधान्य दिले पाहिजे हे ठरवले जाणार आहे. शहराच्या तटबंदीचा प्रश्नमार्गी लावला जाणार आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील १०४ गावांपैकी ५२ गावांना राष्ट्रीय पेयजेल मधून सुमारे ३५ कोटी रूपये योजनांसाठी मंजूर झाला आहे. त्याच बरोबर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून नारायणवाडी, तारूख, मनवरस्ता अशी अनेक कामे भाजप सरकारने कराड दक्षिणेत मंजूर केली आहेत. त्याची यादी पाहिली तर विकास कामांचा आवाका सर्वसामान्य जनतेच्या लक्षात येईल.
डॉ. भोसले पुढे म्हणाले, कराड शहराला अल्टर नेटीव्हर रस्त्यांची नितांत गरज आहे. यासाठी काय पर्याय काढता येईल याचा अभ्यास येत्या काळात केला जाणार आहे. तसेच शहराला जोडणाऱ्या जुना कोयना पुलाचे काम तातडीने करण्याच्या अनुशंगाने सरकार प्रयत्नशील आहे. धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट झाले आहे. त्यानुसार कराड तालुक्यातील अशा पुलांना येत्या काळात तातडीने निधी मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे.
कोयना पुलाच्या कामाचा आढावा घेणार
जुन्या कोयना पुलाच्या कामाला गती नाही, कामगार नाहीत ही अत्यंत गंभीर बाब आहे. शासनाने जेवढ्या कामगारांचा फोर्स दिला असेल तेवढया ताकदीने काम झाले पाहिजे. कामाचा दर्जा अत्यंत चांगला पाहिजे. मात्र कामाबाबत तक्रारीत वाढ झाल्याने संबंधित कामासंदर्भात विभागाची बैठक घेऊन जुन्या पुलाच्या कामकाजाचा आढावा घेणार असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.
उपनगराध्यक्ष व नगरसेवकांची पाठ
कराड नगरपालिकेशी संबंधित विकासाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेस फक्त नगराध्यक्षा रोहिणी शिंदे उपस्थित होत्या. कराड नगरपलिकेला वैशिष्टयपूर्ण कामातून निधी मिळाला असतानाही उपनगराध्यक्ष व नगरसेवक, पदाधिकारी गैरहजर राहिले. तसेच भाजपचेही नगसेवकांनी पाठ फिरवली. या प्रश्नावर बोलताना डॉ. भोसले म्हणाले, त्यांच्या मागे पालिकेची अनेक कामे असतील ते आमच्या बरोबरच आहेत, अशी सारवासारव त्यांनी केली.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |