Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001
contact@tmnnews.com
02162 237 474
सातारा : सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणा-या माहेश्वरी फौंडेशन ट्रस्टच्यावतीने शासकीय पुरुष भिक्षेकरी गृहात संस्थेतील प्रवेशितांना 100 सतरंजी आणि चादरीचे वाटप करण्यात आले. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याहस्ते आणि ट्रस्ट पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
सातारा शहरातील माहेश्वरी फौंडेशन ट्रस्टच्यावतीने नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्याचप्रमाणे समाजातील वंचित घटकांना सहाय्य केले जाते. त्याच भावनेतून शासकीय पुरुष भिक्षेकरी गृह संस्थेत ट्रस्टच्यावतीने 100 सतरंजी आणि चादरीचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची उपस्थिती होती. त्यांच्याहस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी संस्थेने भिक्षेकरी गृहातील प्रवेशितांना मदत करुन सामाजिक बांधिलकी जोपासलीचे गौरवोद्गार काढले. संस्थेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करुन संस्था आणि दानशूर व्यक्ती करत असलेल्या मदतीबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे अधीक्षक शिवाजी खुडे यांनी सातारा शहरातील दानशूर व्यक्ती वेळोवेळी मदत करत असल्याने भिक्षेक-यांना अधिकच्या सुविधा देता येतात. यावेळी त्यांनी ट्रस्टच्या सर्व पदाधिका-यांचे आभार मानले. याप्रसंगी माधव सारडा म्हणाले, शिवाजी खुडे यांच्या प्रयत्नातून खूप मोठया प्रमाणात देणगी प्राप्त होत असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले. त्याचप्रमाणे ट्रस्ट व ट्रस्टवरील सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी संस्थेस सर्व ती मदत करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमावेळी मुकुंद लाहोटी यांनी दोन मोठया सतरंज्या देण्याचे जाहीर केले. यावेळी राधेश्याम भंडारी, श्रीनिवास झंवर, विनोद राठी, माधव सारडा, दिलीप शहा, मुकुंद लाहोटी, हरी कासट, नरेंद्र मिणीयार, प्रमोद लाहोटी, दिलीप लोया, श्रीराम सारडा, दिलीपभाई शहा व सर्व माहेश्वरी ट्रस्टचे संचालक उपस्थित होते. कार्यक्रमास संस्थेचे अधीक्षक शिवाजी खुडे, अधिकारी डॉ. बी.डी.खाडे, टी.व्ही.सूरत्राण उपस्थित होते.
कारंडवाडी ता.सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी घरातील उघड्या खिडकीतून आकडा टाकून पर्स लांबवली. या पर्समध्ये सोन्याचे गंठण होते.
पानपट्टीची उधारी मागितल्याने चिडून जावून पानटपरी चालकाच्या डोक्यात बियरची बाटली डोक्यात फोडून मारहाण करण्यात आली. ही घटना एमआयडीसी येथे घडली असून याप्रकरणी तिघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सौ.धनश्री उमेश टकले (वय 41, रा.रविवार पेठ, सातारा) या विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती उमेश दत्तात्रय टकले व सासू विमल दत्तात्रय टकले (दोघे रा.शनिवार पेठ, सातारा) यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुशांत अणवेकर यांनी दुर्गसंवर्धन आणि निसर्गसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी सायकलवरुन ट्रान्स सह्याद्री ही 3 हजार किलोमीटर पेक्षाही जास्त अंतर प्रवासाची मोहिम हाती घेतली असून त्यांची ही सायकल मोहिम आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार आ. श्रीमंत छ. शिवेंद्र