05:46pm | Feb 22, 2019 |
सातारा : पुढील महिन्यात येवू घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने माढा लोकसभा मतदारसंघातील बंडाळी रोखण्यासाठी स्वत: खा. शरद पवारांनी माढ्यातून उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने आज फलटण येथील एका मंगल कार्यालयात कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. शरद पवार भाषणाला उठताच माण तालुक्यातील राष्ट्रवादीच्या दोन गटांत जोरदार राडा झाला. शेवटी कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने फलटण येथील एका मंगल कार्यालयामध्ये राष्ट्रवादीतर्फे कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादीतील आमदारांसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. सुमारे दोन वर्षापूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सातारा, सांगली मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या शेखर गोरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतू राष्ट्रवादीमधील काही लोकांनी शेखर गोरेंना सहकार्य न केल्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच गोर्यांचा पराभव झाला होता. याबाबत अनेकदा शेखर गोरेंनी नाराजीही व्यक्त केली होती.
माढा लोकसभा मतदारसंघात बंडाळी होवू नये, यासाठी खा. शरद पवार यांनी यंदा स्वत: माढ्यामधून निवडणूक लढविण्याचे जाहीर केल्यानंतर आज फलटणमध्ये कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. दरम्यान, माणमधील राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या कविता म्हेत्रे व माण-खटावमधून राष्ट्रवादीतून विधानसभेसाठी आग्रही असणारे शेखर गोरे यांच्यामधून सध्या विस्तव जात नाही. या वादातून आज कविता म्हेत्रे कार्यक्रमाच्या व्यासपीठावर बसल्यामुळे शेखर गोरे हे व्यासपीठावरुन खाली येत कार्यकर्त्यांमध्ये जाऊन बसले. यावेळी अनेकांनी त्यांना व्यासपीठावर बसण्याची विनंती केली, मात्र शेखर गोरे व्यासपीठावर न बसता खालीच बसले. यानंतर कविता म्हेत्रेंनी भाषणाला सुरुवात करताच शेखर गोरे समर्थकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सर्व 'सांगा, खरं सांगा, असे म्हणत शेखर गोरे यांचे कार्यकर्ते व्यासपीठाकडे जाऊ लागले. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी चक्क पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. खुद्द शरद पवारांनीही संतप्त कार्यकर्त्यांना शांत राहण्याच्या सूचना केल्या. मात्र कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हते. त्यामुळे शरद पवार हताश झाले. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे कार्यकर्ते आपापल्या जागेवर बसले, तर काही कार्यकर्ते मेळाव्यातून बाहेर पडले. दरम्यान, शरद पवारांच्या उपस्थितीतच राष्ट्रवादी अंतर्गत राड्यामुळे खा. शरद पवारांची आगामी माढ्यातील उमेदवारी धोक्यात येते की काय, अशी चर्चा मेळाव्याच्या ठिकाणी रंगली होती. राष्ट्रवादी अंतर्गत कलहामुळे 'नमनालाचं घडा भर तेल लागल्यामुळे येणारी माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक राष्ट्रवादीसाठी सोपी असणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे.
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |