02:46pm | Nov 05, 2019 |
कराड : ओंड, ता.कराड येथे शिवछावा दांडपट्टा ग्रुपच्यावतीने दरवर्षीप्रमाणे भव्य किल्ला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जवळपास 40 स्पर्धकांनी विविध किल्ले व विशेषत: जलदुर्गांची प्रतिकृती साकारल्या होत्या. या स्पर्धेत मयुरी नामदेव विधाटे हिने साकारलेल्या तोरणा किल्ल्यास प्रथम क्रमांक मिळाला.
श्री.छ.शिवाजी महाराज व श्री.छ.संभाजी महाराज यांच्या ऐतिहासिक योगदानाबरोबरच विविध किल्ले व दुर्ग याबाबत विद्यार्थ्यांना अधिकाधिक माहिती मिळावी या हेतूने ओंड,ता.कराड येथील शिवछावा दांडपट्टा ग्रुपच्यावतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित किल्ला स्पर्धेत 16 वर्षांखालील सुमारे 40 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक स्पर्धकाने स्वत:च्या जागेत बनविलेल्या किल्ल्यांची पाहणीसाठी ओंड गावात गर्दी दिसून येत होती. ऐन दिवाळीत सतत पावसाने हजेरी लावली तरीही स्पर्धकांनी चांगला प्रतिसाद देत किल्ल्यांची उभारणी केली.
या किल्ला स्पर्धेत आलेले क्रमांक पुढीलप्रमाणे: प्रथम- मयुरी नामदेव विधाटे (तोरणा), द्वितीय- गणेश भिमराव जाधव (रायगड), तृतीय- प्रणव रमेश थोरात (तोरणा), चतुर्थ- हर्षद अभिजीत भंडारे (सिंधूदुर्ग), पाचवा- विवेक जयसिंग शिंदे (जिंजरा). उत्तेजनार्थ- निखिल शत्रुघ्न थोरात (प्रतापगड), प्रथमेश दिलीप थोरात व पारस मानसिंग थोरात (सिंधुदुर्ग).
यावेळी स्पर्धेत सर्व स्पर्धकांना ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्यावतीने प्रशस्तिपत्र देण्यात आले. तर या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे 2001 रुपयांचे बक्षिस कै.शामराव ज्ञानू थोरात यांच्या स्मरणार्थ प्रमोद शामराव थोरात यांच्याकडून, द्वितीय क्रमांकाचे 1555 रुपयांचे बक्षिस नलवडे इन्ङ्गोटेक यांच्याकडून, तृतीय क्रमांकाचे 1001 रुपयांचे बक्षिस प्रविण उत्तमराव थोरात यांच्याकडून, चतुर्थ क्रमांकाचे 777 रुपयांचे बक्षिस संग्रामसिंह भगवान थोरात यांच्याकडून तर पाचव्या क्रमांकाचे 555 रुपयांचे बक्षिस पै.प्रविण अधिकरराव थोरात यांच्याकडून देण्यात आले. उत्तेजनार्थ बक्षिस योगेश शेटे, सागर उर्ङ्ग नाथाभाउ थोरात, प्रदीप माळी व सोमनाथ सुतार यांच्याकडून देण्यात आले.
या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश पोळ, आनंदा थोरात, प्रमोद थोरात, ऋषीकेश जाधव यांनी काम पाहिले. या स्पर्धेचे बक्षिस वितरण ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष आनंदा थोरात, प्रमोद शामराव थोरात, प्रमोद सर्जेराव थोरात, अनिकेत मोरे, किसन थोरात, श्रीरंग थोरात, राजाराम सुतार, सुनील जाधव, युवराज थोरात, आबासाहेब सुतार यांच्या उपस्थितीत देण्यात आले. स्पर्धेविषयी माहिती शिवछावा दांडपट्टा ग्रुपचे अध्यक्ष विक्रांत थोरात यांनी स्पर्धेविषयी माहिती दिली. उपाध्यक्ष गणेश थोरात यांनी स्वागत केले. कार्याध्यक्ष राजू चव्हाण यांनी आभार मानले.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |