10:16pm | Apr 21, 2020 |
कराड : बाबरमाची परिसरातील कोरोना रूग्णांच्या संपर्कात आल्याने वनवासमाची (खोडशी) आणि आगाशिवनगर (मलकापूर) येथील दोघांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळेच एकट्या कराड तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या 8 झाली असून सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 16 इतकी झाली आहे.
जिल्ह्यातील तीन कोरोनाग्रस्त रूग्ण यापूर्वीच बरे होऊन रूग्णालयातून घरी गेले आहेत. याशिवाय दोन कोरोनाग्रस्त रूग्णांचा उपचारावेळी मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मागील सहा दिवसांत जिल्ह्यातील एकट्या कराड तालुक्यात 6 नवे कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी बाबरमाची परिसरातील रूग्णास कोरोनाची बाधा झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले होते. या रूग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना प्रशासनाने क्वारंटाईन करून त्यांची तपासणी केली होती. या लोकांपैकी वनवासमाची (खोडशी) आणि आगाशिवनगर (मलकापूर) येथील दोघांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संपूर्ण सातारा जिल्ह्यात 16 कोरोनाबाधित रूग्ण आजवर सापडले आहेत. त्यापैकी एकट्या कराड तालुक्यात 8 जण आढळून आल्याने कराडकरांची चिंता वाढली असून आता प्रशासनाने कठोर उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे.
दरम्यान, क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 1 अनुमानित निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 19, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 13, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 14, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे 13, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे 9 असे एकूण 68 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |