06:17pm | Mar 24, 2019 |
सातारा : राज्यात चर्चिल्या गेलेल्या माढा लोकसभेची उमेदवारी फलटण येथील युवा नेते तथा कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना जाहीर झाली असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला बोलताना दिली.
कोणाच्याही ध्यानीमनी नसताना सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी काल कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत आपला राजिनामा सोशल मिडियावर प्रसारित करुन भाजपचा झेंडा हाती घेत असल्याचे जाहीर केले होते. आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रणजितसिंह नाईक-निंबाळकर उद्या भाजपात प्रवेश करणार असून माढा लोकसभेसाठी भाजपकडून त्यांचेच नाव फायनल असल्याचे सूतोवाच केले. माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजिव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी गेल्या आठवड्यातच भाजपमध्ये प्रवेश करुन राष्ट्रवादीला धक्का दिला होता. असे असले तरी खा. विजयसिंह मोहिते पाटील अजून राष्ट्रवादीतच आहेत. त्यांनी आपल्या खासदारकीचा अथवा पक्ष सदस्यत्वाचा राजिनामा दिलेला नाही. असे असतानाच काल फलटण येथील युवा नेते तथा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आपल्या पदाचा व कॉंग्रेस सदस्यत्वाचा राजिनामा देत भाजपचे कमळ हाती घेतले. गेली दहा वर्षे फलटण- लोणंद- बारामती हा जाणीवपूर्वक राष्ट्रवादीने रखडवलेला रेल्वे प्रकल्प, फलटण तालुक्यासह दुष्काळी पट्ट्याला वरदाई ठरणारा नीरा-देवधर प्रकल्प ज्या माझ्या दोन पिढ्यांनी लोकजागृती करुन, लढा उभारुन मंजुरी मिळवलेले प्रकल्प राष्ट्रवादीने रखडवले यामुळेच फलटण सह दुष्काळी पट्टा आजही भीषण दुष्काळाचा सामना करतोय. या कारणांमुळेच माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधात काम करण्याची भूमिका मी घेतली आहे, अशी कारणे देत काल रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपला राजिनामा ‘सातारा टुडे’च्या व्हॉटसऍप ग्रुपसह इतर ठिकाणी प्रसारित केला होता. रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय समजले जातात. कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष पदावर असतानाच रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राजिनामा दिल्यामुळे काल जिल्हाभरात खळबळ उडाली होती. ‘सातारा टुडे’नेच हे वृत्त सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते. दरम्यान, उद्या दुपारी रणजितसिंह नाईक-निंबाळकर भाजपात जाहीर प्रवेश करणार आहेत. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा सामना राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांच्याशी होणार असल्यामुळे ही लढत तुल्यबळ समजली जात आहे. उद्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची माढ्यातून उमेदवारी जाहीर होणार आहे. आता केवळ औपचारिकता बाकी असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |