कराड : चाफळ (ता. पाटण) येथील बसस्थानकासमोर डबलबारी बंदुकीतून गोळ्या झाडून एकाचा खून केल्याप्रकरणी आरोपी चंद्रकांत महादेव भाईगडे (रा. जाधववाडी-चाफळ, ता. पाटण) यास कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एच. केळूसकर यांनी आजन्म कारावास आणि पाच हजार रूपये दंड, तसेच आर्म अॅक्ट अन्वये पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. आरोपी भाईगडे याने 25 ऑगस्ट 2016 रोजी विकास बबन साळुंखे याचा गोळ्या झाडून खून केला होता.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, विकास बबन साळुंखे (वय 40, रा. भांबेवाडी-चाफळ, ता. पाटण) आणि आरोपी चंद्रकांत भाईगडे हे दि. 25 ऑगस्ट 2016 रोजी चाफळ बसस्थानकासमोर उभे होते. त्यावेळी साळुंखे हा भाईगडेला म्हणाला, आठवडा बाजारावेळी तू जीप घेऊन का येतोस. त्याचा लोकांना त्रास होतो. याचा राग आल्याने आरोपी चंद्रकांत भाईगडे याने जीपमधील डबलबारी बंदूक काढून विकास साळुंखे यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या. त्यात साळुंखे ठार झाले होते. याप्रकरणी सुधीर सुरेश साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उंब्रज पोलीस ठाण्यात चंद्रकांत भाईगडे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. उंब्रजचे तत्कालिन सहाय्यक पोलीस निरीक्षक के. जी. घाडगे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील अॅड. विजय आबासाहेब पाटील यांनी 24 साक्षीदार तपासले. त्यापैकी फिर्यादी सुधीर सुरेश सांळुखे यांच्यासह प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. साक्षीदारांच्या साक्षी आणि सरकारी वकीलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी चंद्रकांत भाईगडे यास दोषी धरून खुनाच्या आरोपाखाली आजन्म कारावास आणि 5 हजार रूपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने कारावास, आर्म अॅक्ट अन्वये दोषी धरून 5 वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. आरोपीने या सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत. या खटल्याच्या कामी सहाय्यक जिल्हा सरकारी वकील अॅड. विजय आबासाहेब पाटील यांना सरकारी वकील अॅड. एम. व्ही. कुलकर्णी, अॅड. आर. सी. शहा, पैरवी अधिकारी आर. बी पवार, पी. एस. भोसले, एच. एच. देशमुख, डी. बी. कोळी, ओ. के. मदने, के. एम. चव्हाण, जी. जी. माने यांनी सहकार्य केले.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |