सातारा : कराडजवळून आज दुपारी एका निवृत्त डीवायएसपींचे अज्ञात टोळीने त्यांच्या गाडीसह अपहरण केले. त्यांच्याजवळ सुमारे साडेचार कोटी रूपये होते.
या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली असून आरोपींच्या शोधासाठी जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. पुणे - बंगळुरू महामार्गावर आज दुपारी अडिचच्या सुमारास ही थरारक घटना घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, विजापूर जिल्ह्यातील निवृत्त पोलीस उपअधीक्षक चौकीमठ कारखान्याच्या अॅग्रिमेंटसाठी स्कॉर्पिओ (एमएच१५ बीएच ४९५८) गाडीतून सोबत सुमारे साडेचार कोटी रूपयांची रोकड घेऊनसातारकडे येत होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर तीनजण होते.कराड सोडल्यानंतर साधारणत: तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेल महेंद्रजवळ ते थांबले असताना अचानक सिनेस्टाईलने नंबर प्लेट नसलेल्या दोन ग्रे रंगाच्या इनोव्हा गाड्या त्यांच्या गाडीच्या बाजुला थांबल्या. त्यातून पाचजण उतरून जबरदस्तीने स्कॉर्पिओ गाडीत बसले व त्यांनी गाडीसातारच्या दिशेने नेण्यास सुरूवात केली. उंब्रजजवळ मसूर फाट्यावर गाडीआल्यावर तिथे गाडी थांबवून त्यातील दोघांना खाली उतरवण्यात आले. त्यानंतरगाडी भरवेगात पुण्याच्या दिशेने निघून गेली.ही घटना समजताच जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली. जिल्हा पोलीस प्रमुखसंदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदीकरण्यात आली. यासंबंधीचे संदेश आजुबाजुच्या जिल्ह्यात पाठवून तिकडेहीनाकाबंदी करण्यात आली आहे. अपहृत वाहन व निवृत्त पोलीस उपअधीक्षक चौकीमठयांचा कसून शोध घेतला जात आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |