कराड : महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे 32 वे आणि दुसरे अखिल भारतीय पक्षमित्र संमेलन दि. 23 व 24 नोंव्हेबर रोजी येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती कराड जिमखान्याचे जनरल सेक्रेटरी सुधीर एकांडे यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते.यावेळी कराड जिमखान्याचे अध्यक्ष महेंद्रकुमार शहा, उपाध्यक्ष दिपक वाटेगांवकर, रोहन भाटे, निसर्ग विभाग प्रमुख नाना खामकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुधीर एकांडे म्हणाले, अखिल भारतीय स्तरावरील दुसरे आणि राज्य स्तरावरील 32 वे हे पक्षीमित्र संमलेन होणार आहे. या संमेलनांचे प्रायोजक कराड जिमखाना असून महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, महाराष्ट्र वनविभाग, सहयाद्री व्याघ्र राखीव यांच्या विशेष सहकार्यातून हे संमेलन होत आहे. दि. 23 व 24 नोंव्हेंबर या कालावधीत पार पडणार्या या संमेलनाचे उद्घाटन सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते व वनंमत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी वन्यजीव विभाग कोल्हापूरचे मुख्य वनसरंक्षक डॉ.व्ही. क्लेेमेंट बेन, उपसंचालक डॉ. विनीता व्यास, उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा. राज्य जैव विविधता मंडळाचे चेअरमन डॉ. विलास बर्डेकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक अश्रफ अहमद व राज्य पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनात देशातील विविध राज्यातून पक्षी अभ्यासक, निरीक्षक व निसर्ग संवर्धक मोठया संख्येने सहभागी होणार आहेत. या संमेलनात पक्षी व निसर्ग संवर्धन या विषयावर विविध चर्चासत्रे, व्याख्याने, परिसंवाद, स्लाईड शो, प्रकट मुलाखत अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परिसंवाद, चर्चासत्र व प्रकट मुलाखतीत डॉ. जयंत वडतकर, डॉ. राजू कसंबे, डॉ. वरद गिरी यांच्यासह देशातील अनेक नामवंत तज्ञ सहभागी होणार आहेत. निसर्गचक्रातील महत्वाचा घटक असलेले पक्षी वैभव टिकवणे या हेतूने या संमेलनाचे आयोजन केले जाते.
या संमेलनात राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सर्वोत्कृष्ठ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तसेच शालेय स्तरावर याच विषयावर चित्रकला व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे नियोजन करण्यात येणार आहे.रोख रक्कम व प्रमाणपत्र असे या स्पर्धेतील बक्षीसांचे स्वरूप आहे. तसेच विविध देशातील पोस्टाच्या तिकीटावरील व नाण्यांवरील पक्षांची छबी असलेल्या तिकीटांचे व नाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याचे सुधीर एकांडे यांनी सांगितले.
फोटोः पत्रकार परिषदेत पक्षीमित्र संमेलनाचे लोगोचे प्रकाशन करताना सुधीर एकांडे, रोहन भाटे, महेंद्रकुमार शहा, नाना खामकर व इतर.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |