सातारा: गोळेवाडी, ता. फलटण येथे रागाच्या भरात दारूच्या नशेत असणार्या वडिलांनी आईला मारहाण केली. आई-वडीलांची भांडणे सोडवण्यास गेलेल्या मुलालाही वडीलांनी मारहाण केल्याने त्या रागातून मुलगा सुहास सतीश उंबरे (वय 24) याने वडीलांचा कुर्हाडीने मानेवर वार करून खून केला. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने सुहास उंबरे याला 3 वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावली आहे.
1 मे 2016 रोजी दुपारी सतीश देवराज उंबरे (वय 62) हे मद्यपान करून आले होते. त्या नशेमध्येच पत्नी लता सतीश उंबरे (वय 45) यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. घरात असणार्या सुहास उंबरे याने ही मारहाण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नशेत असणार्या सतीश यांनी सुहासवरही कुर्हाडीने घाव घातला. यामध्ये त्याच्या हाताला जखम झाली. याचा सुहासला राग आला यातूनच सुहासने वडील सतीश यांच्या डोक्यात कुर्हाड घालून त्यांचा खून केला.
याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार एस. व्ही. लांडे यांनी केला. तपास पूर्ण करून त्यांनी दोषारोप पत्र दाखल केले होते. या गुन्ह्यात सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त सहाय्यक जिल्हा सरकारी वकील अॅड. अजित प्रताप कदम (साबळे) यांनी युक्तिवाद केला. या गुन्ह्यामध्ये एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले. खूनाच्यावेळी घटनास्थळी असणारे आरोपीची आई लता उंबरे व पत्नी यांनी फितुरी केली.
त्यानंतर वैद्यकीय अधिकारी आणि परिस्थितीजन्य पुरावाच्या आधारे सुहास उंबरे याला दुसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. ए. ढोळकीया यांनी 3 वर्षाची शिक्षा सुनावली.
या खटल्यात प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलिस उपनिरीक्षक पी. के. कबुले, हवालदार शमशुद्दीन शेख, संजय पाटील, सुनील सावंत, नंदा झांजुर्णे, कांचन बेंद्रे आणि अजित शिंदे यांनी सहकार्य केले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |