03:58pm | Aug 26, 2019 |
सातारा : वाहनचालकांना वाहतुकीचे नियम शिकवणार्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कार्यालयासमोरच रस्त्याच्या दुतर्फा होत असलेल्या बेकायदेशीर चारचाकी व दुचाकीच्या पार्किंगमुळे अजिंक्य हॉस्पिटल ते सैनिक स्कूल मार्गावर आरटीओ अधिकारी आणि एजंटांच्या संगनमताने रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंगचा अक्षरश: बाजार भरत आहे. मात्र, या रस्त्यावरुन प्रवास करणार्यांना मात्र या बेकायदेशीर पार्किंगचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच याठिकाणी राहत असलेल्या नागरिकांनाही याठिकाणी राहणे मुश्किल झाले आहे.
वरवरुन शिस्तबद्ध काम दिसत असलेल्या आरटीओ कार्यालयाला काही भ्रष्ट अधिकार्यांमुळे वाळवी लागली असतानाच आरटीओ कार्यालयासमोर असलेल्या अजिंक्य हॉस्पिटल ते सैनिक स्कूल मार्गावर अनेक एजंटांनी बेकायदेशीर दुकाने थाटली आहेत. आरटीओची कामे करणारे एजंट, झेरॉक्स, पीयुसी सेंटर, हॉटेल तसेच परिवहन कार्यालयाशी संबंधित असणार्या इतर कामांसाठी लागणार्या गोष्टींची दुकाने याठिकाणी बेकायदेशीररित्या उभी आहेत. तसेच एजंटांकडून विविध माहिती असलेले बोर्ड, स्टँडीज रस्त्याच्या मधोमध लावल्यामुळे याठिकाणी रस्ता झाकोळला जात आहे. हा रस्ता आहे, की भरलेला आठवडी बाजार आहे, हेच अनेकांना समजत नाही. या मार्गावरुन प्रवास करताना अक्षरश: जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. तसेच नव्याने सुरु करण्यात आलेल्या ब्रेक टेस्टिंग ट्रॅक मुळे याठिकाणी अवजड वाहनांची रांग लागलेली असते. सदर बझार हा तसा सातार्यातील शांत परिसर. अनेक निवृत्त अधिकार्यांची निवासस्थाने, सैनिक स्कूल, जिल्हा पोलीस अधीक्षकांचे निवासस्थान तसेच कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयही याच परिसरात आहे. असे असताना आरटीओ अधिकार्यांच्या गांधारीच्या भूमिकेमुळे आरटीओ कार्यालयात बेकायदेशीर काम करणार्या एजंटांची दादागिरी वाढलेली आहे. या आरटीओ एजंटांकडे कामासाठी येणारे अनेक वाहनधारक आपली वाहने रस्त्याच्या मधोमध उभी करतात. यासंदर्भात त्यांना हटकले असता अनेकवेळा वादाचे प्रसंग उद्भवतात. कधीकधी हातघाईही होते. यासंदर्भात स्थानिक रहिवाशांनी आरटीओ कार्यालयाला पत्रव्यवहारही केलेला आहे. मात्र आरटीओ कार्यालयाकडून या पत्रव्यवहाराला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. सातार्यात बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणारी शहर वाहतूक शाखाही या अवैध पार्किंग बाजाराकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करते. सातारा शहरात बेशिस्त वाहन पार्किंग करणार्यांच्या छातीत धडकी भरवणारी सातारा वाहतूक शाखेला आरटीओ कार्यालयासमोर बेशिस्त पार्किंग दिसत नाही काय? असा प्रश्नही या परिसरात राहणार्या ज्येष्ठ नागरिकांनी केलेला आहे. लोकांना वाहतुकीचे ब्रह्मज्ञान शिकवणार्या आरटीओ कार्यालयास आपल्या नियमांचा आणि शिस्तीचा विसर पडल्यामुळे आरटीओ कार्यालयासमोर बेशिस्त वाहन पार्किंगची बजबजपुरी झालेली आहे. या अवैध पार्किंगवर येत्या दिवसांत तोडगा न निघाल्यास या संदर्भात जनआंदोलन करण्याचा इशारा या परिसरात राहणार्या स्थानिक रहिवाशांनी दिलेला आहे.
बेकायदेशीर एजंटांना व पार्किंला चाप लावणार : संजय राऊत
सातारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर अजिंक्य हॉस्पिटल ते सैनिक स्कूल मार्गावर बेशिस्त वाहन पार्किंगवर तसेच व्यवसायिकांनी रस्त्याच्या मधोमध लावलेल्या बोर्डवर कारवाई केली जाईल. याठिकाणी सम-विषम तारखेला पार्किंगचे वाहतूक विभागाकडून सर्व्हेक्षण झालेले आहे. सम-विषम तारखेच्या पार्किंगच्या बोर्डांची मागणी सातारा पालिकेकडे करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत सातारा पालिकेकडून बोर्ड मिळाल्यानंतर याठिकाणी बोर्ड लावले जाणार आहेत. तसेच बेकायदेशीर एजंटांवरही कारवाई करणार असल्याची माहिती सातारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी 'सातारा टुडे'शी बोलताना दिली आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |