06:39pm | May 25, 2018 |
सातारा : जिहे-कठापूर योजनेचे शिल्पकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या योजनेला द्यावे, याचे जोरदार समर्थन शिवसेनेने करुन याबाबत राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे यांनी नेतृत्व करावे, तसेच निधी उपलब्ध नसतानाही पोस्टरबाजी करणार्या मोदी भक्तांच्या थापालॉजीबाबत शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख नरेंद्र पाटील यांनी पाटली भाषेत समाचार घेवून तीव्र नाराजी बैठकीत व्यक्त केली. आक्रमक झालेल्या आ. शिंदे व नरेंद्र पाटील यांच्या प्रश्नांच्या भडीमारामुळे अधीक्षक अभियंता विजय घोगरे यांनी वस्तुस्थिती मांडून ही योजना 29 डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला.
आ. शिंदे म्हणाले, 8 महिन्यांच्या मंत्रीपदाच्या कालावधीमध्ये तीन महिने आचारसंहितेमुळे काम करता आले नाही. तरीही नेर, ता. खटाव येथील आजूबाजुच्या गावांना जिहे-कठापूर योजनेचे पाणी मिळावे, यासाठी 1 कोटी सर्वेक्षणासाठी मंजूर केले. सध्या पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय केला जात असून भाजप सरकार सूडबुद्धीने वागत आहे. वंचित भागांना न्याय द्यावा, यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न करुन कृष्णा लवादाच्या माध्यमातून 81 टीएमसी पाण्यावर हक्क सांगितला आहे. सध्या जलयुक्त शिवार अभियानातून बंधारे बांधले जात आहेत. पण 5 वर्षात त्यातील गाळ न काढल्यास पूर्वीसारखीच परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली. शिवसेनेचे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शिवसेनाप्रमुखांनी 1985 साली कोणताही राजकीय फायदा झाला नसतानाही कृष्णा खोर्याची निर्मिती केली. त्यामुळे त्यांचे नाव या योजनेला द्यावे. सध्या छ. शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या नावाला कोणाचाही विरोध नाही. परंतू भाजपने लक्ष्मण इनामदार यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. मुळात इनामदार यांचा या योजनेशी कवडीमात्र संबंध नाही. उलट, भाजपचे नितीन गडकरी हे या योजनेचे मारेकरी आहेत. त्यामुळे सेनाप्रमुखांचे नाव देण्यासाठी आ. शिंदे यांनी पुढाकार घ्यावा, असे स्पष्ट केले.
सातारा पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विजय घोगरे यांनी सर्व आंदोलकांची बाजू ऐकून घेतल्यानंतर शासनाची भूमिका मांडताना स्पष्ट केले की कृष्णा खोरे विकास महामंडळासाठी 1 हजार कोटींचे बजेट आहे. परंतू आर्थिक अनुशेष व इतर कामासाठी पुरेसा निधी जरी मिळाला नाही तरीही पंतप्रधान कृषी योजनेतून महाराष्ट्रातील 26 योजनांपैकी सातारा 5, सोलापूर 1 व सांगली 1 योजनेला निधी मिळणार आहे. 1995 साली 250 कोटीच्या योजनेला मंजूरी मिळाली. सध्या ही योजना 1025 कोटींपर्यंत पोहोचली आहे. यंदा 30 कोटी रुपयांची तरतूद झाली असून डिसेंबर 2019 पर्यंत पंप हाऊस, पाईपलाईन व रेल्वे क्रॉसिंग पाईपलाईन अशी तांत्रिक कामे पूर्ण केली जाणार आहेत. केंद्रीय जलआयोगाच्या 16 संचालकांनी प्रस्तावाला मान्यता दिली असून एका संचालकाची परवानगी अंतिम टप्प्यात आहे, असे स्पष्ट करुन सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. या बैठकीला जि. प. सदस्य प्रदिप विधाते, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रताप जाधव, दिनेश देवकर, भानुदास कोरडे, संजय घोरपडे, राष्ट्रवादीचे खटाव तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, पं. स. सदस्य संतोष साळुंखे, राजेंद्र कचरे व जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता संजय बोडखे व अधिकारी उपस्थित होते.
तत्पूर्वी जिहे-कठापूर प्रश्नी खटाव बंदचे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद लाभल्यानंतर आज दुपारी कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यालयात संयुक्त बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी व शिवसेना विरोधी सत्ताधारी भाजप असाच सामना पहावयास मिळाला. त्यामुळे भविष्यात सातारा जिल्ह्यात भाजपला कोंडित पकडून कर्नाटकची पुनरावृत्ती होईल का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. या बैठकीला कार्यकारी अभियंता घोगरे यांनी केलेल्या कामाचा तपशील दिला तसेच समन्वयाची भूमिका घेतल्यामुळे संघर्ष टळला होता.
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |