सातारा : मिलिटरी अपशिंगे (ता.सातारा) येथील वृध्देशी ओळख वाढवत शनिवारी सांयकाळी सातच्या सुमारास सातारा येथे अज्ञात महिलेने 40 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवले. ही घटना सातारा बसस्थानक परिसरातील सेव्हन स्टार इमारतीजवळ घडली असून शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. दरम्यान, महिलेकडून महिलेची फसवणूक व चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून सातारा गेल्या अनेक वर्षापासून अशी टोळी कार्यरत असल्याचे समोर आले आहे.
द्रौपदा जर्नादन पांढरे (वय 65, रा.मि.अपशिंगे) यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. शनिवारी त्या कामानिमित्त सातारामध्ये आल्या होत्या. काम झाल्यानंतर त्या मध्यवर्ती बसस्थानकाजवळील सेव्हन स्टार कॉम्प्लेक्स परिसरात थांबल्या होत्या.त्यावेळी एक अनोळगी महिला आली व रस्ता ओलांडून देते असे सांगितले. बोलत असतानाच आपले एकच माहेर असल्याची थाप मारत अज्ञात महिलेने ओळख असल्याचे भासवले.
अज्ञात महिला बोलत असतानाच द्रोपदा पांढरे यांना परिसरात चोर्यामार्या होत असल्याने गळ्यातील सोन्याची माळ काढून ठेवा, असे सांगितले. त्यानुसार पांढरे यांनी गळ्यातील 40 हजार रुपयांचा ऐवज काढताच अज्ञात महिलेने सोन्याची माळ बांधून देते असे सांगितले व हात चलाखीन ती माळ चोरली. रस्ता ओलांडल्यानंतर ती महिला पांढरे यांना सोडून निघून गेली.
अज्ञात महिला परिसरातून निघून गेल्यानंतर द्रोपदा पांढरे यांना त्यांच्या पर्समध्ये सोन्याची माळ नसल्याचे लक्षात आले. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेचा पुढील तपास फौजदार शेडगे करत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |