नवी दिल्ली : पाकिस्तान उच्चायोगातून २३ भारतीय पासपोर्ट गहाळ झाल्याने खळबळ २३ भारतीय पासपोर्ट गहाळ झाल्याने खळबळ उडाली आहे. पासपोर्टच गायब झाल्याने सुरक्षा यंत्रणाना अलर्ट करण्यात आले आहे. गहाळ झालेले बहुतांश पासपोर्ट शीख भाविकांचे आहेत. हे भाविक पाकिस्तानस्थित गुरुद्वारांना भेट देणार होते. यामध्ये करतारपूर साहिबचाही समावेश आहे. याच ठिकाणी गेल्या महिन्यात पाकिस्तानकडून करतारपूर कॉरिडॉरचे भूमीपूजन करण्यात आले होते.
पासपोर्ट गहाळ झालेल्या भाविकांनी प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट गहाळ झाल्याने पाकिस्तान उच्चायोगाकडे दाद मागितली आहे. गुरुनानक यांच्या ५४९व्या जयंतीनिमित्त पाकिस्तानकडून ३ हजार ८०० शीख भाविकांना व्हिसा देण्यात आला आहे. नोव्हेंबर २१ ते ३० दरम्यान हा सोहळा होणार होता. पाकिस्तानने पासपोर्ट गहाळ होण्याची जबाबदारी फेटाळून लावली आहे.
दिल्लीतील एका एजंटकडून २३ पासपोर्ट जमा करण्यात आले होते. ते पासपोर्ट पुढील प्रक्रियेसाठी पाकिस्तान उच्चायोगात जमा केले होते. प्रक्रिेया पुर्ण झ्राली आहे, की नाही हे पाहण्यासाठी ज्यावेळी तो एजंट पाकिस्तान उच्चायोगाकडे गेला त्यावेळी पासपोर्ट नसल्याचे सांगितले. अशी माहिती त्या एजंटने भारतीय अधिकाऱ्यांना दिली. शीख धर्मियांच्या भावना लक्षात घेऊन पाकिस्तानस्थित करतारपूर साहिबला भेट देण्यासाठी भारताकडून कोणतीही अट घातलेली नाही. हे ठिकाण भारतीय सीमेपासून हाकेच्या अंतरावर आहे. या सोयीचा पाकिस्तानकडून गैरवापर होण्याची शक्यता एका अधिकाऱ्याने खासगीत बोलताना व्यक्त केली.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |