सातारा : कुकुडवाड, ता. माण येथील शिवाजीनगरमध्ये काल दि. 22 रोजी रात्री घरगुती वादातून जावयाने केलेल्या तलवार हल्ल्यात सासू जागीच ठार झाली, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ठाणे येथील दिवा येथे राहणार्या आबासो बबन काटकर (वय 40) याची शिवाजीनगर (कुकुडवाड, ता. माण) ही सासुरवाडी आहे. मंगळवारी तो पत्नी व दोन लहान मुलांसह नरवणे, ता. माण येथे सुट्टीसाठी आला होता. आबासो काटकर व त्याच्या पत्नीसोबत काही कारणांमुळे कौटुंबिक वाद होता. नरवणे येथे आल्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. भांडणानंतर संबंधित विवाहिता मुलांसह नरवणे येथील तिच्या मामाच्या घरी गेली. परंतू वाद वाढेल, या विचाराने विवाहितेच्या मामाने तिच्या आईच्या घरी (शिवाजीनगर) येथे सोडले. दरम्यान, ही गोष्ट संशयित आरोपी आबासो काटकर याला समजताच त्याने आपला मोर्चा शिवाजीनगरकडे वळवला. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तो शिवाजीनगर येथील सासुरवाडीत पोहोचला. तेथे गेल्यानंतर पत्नीसह त्याचे कडाक्याचे भांडण सुरु झाले. यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी त्याची सासू रंजना हणमंत भोसले (वय 55) आली असता चिडून जावून आबासो काटकर याने सोबत आणलेल्या तलवारीने सासूवर सपासप वार केले. घाव वर्मी बसल्यामुळे सासू जागीच ठार झाली. तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. पत्नीवर म्हसवड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या तलवार हल्ल्यामुळे म्हसवड परिसरात एकच खळबळ उडाली असून याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून याबाबतचा अधिक तपास म्हसवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |