06:24pm | Jan 08, 2019 |
सातारा : वाखरी, ता. फलटण येथे मामाकडे शिक्षणासाठी असलेल्या नववीतील अल्पवयीन मुलीचे तिच्या राहत्या घरातून वाखरी येथील दोघांनी दि. 29 डिसेंबर 2018 रोजी दुपारी अपहरण केले आहे. संबंधित अल्पवयीन मुलगी अद्याप सापडली नसून अपहरण करणारा उमेश जाधवही फरार असून त्याला साथ देणारा अंगद कोंडिबा ढेकळे मात्र पोलिसांच्या आशिर्वादाने गावात उजळ माथ्याने फिरत आहे. यासंदर्भात मुलीच्या चुलत्याने पोलीस अधीक्षक सातारा यांना निवेदन दिले असून संबंधित अल्पवयीन मुलीचा शोध घेवून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
यासंदर्भातील सविस्तर माहिती अशी की, अलगुडेवाडी, ता. फलटण येथील एक अल्पवयीन मुलगी तिच्या मामाकडे वाखरी, ता. फलटण येथे शिक्षणासाठी रहावयास आहे. सध्या ती वाखरी येथील शाळेत नववीच्या इयत्तेत शिकत आहे. असे असताना दि. 29 डिसेंबर 2018 रोजी दुपारी अडीचच्या सुमारास गावातीलच उमाजी उर्फ उमेश बाळू जाधव (वय 23) व त्याचा साथीदार अंगद उर्फ आदिक कोंडिबा ढेकळे यांनी संगनमताने संबंधित अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातून अपहरण केले. यातील संशयित उमाजी जाधव हा संबंधित मुलीस माझ्याशी लग्न कर, असा तगादा अनेक दिवसांपासून लावत होता. त्यामुळे संबंधित मुलगी व तिचे मामा-मामी या सर्व प्रकाराला वैतागले होते. असे असतानाच 29 डिसेंबर रोजी संबंधित अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला असून फलटण ग्रामीण पोलीसांना मुलीसह संबंधित आरोपी अद्याप सापडले नाहीत. परंतू यातील एक संशयित अंगद उर्फ आदिक कोंडिबा ढेकळे मात्र वाखरी गावात उजळ माथ्याने फिरत आहे. आदिकला संबंधित अल्पवयीन मुलगी व तिचा अपहरण करणारा उमाजी कोठे आहे, याची माहिती असतानासुद्धा फलटण ग्रामीण पोलिसांनी अद्याप त्याच्यावर कारवाई केलेली नाही. त्यामुळे मुलीच्या पालकांनी आज सातारा जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांच्याकडे याबाबतचे निवेदन दिले असून संबंधित अल्पवयीन मुलीचा शोध घेवून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे.
अल्पवयीन मुलीवरच आरोपीस पळवून नेल्याचा आरोप
29 डिसेंबर रोजी मुलीचे अपहरण झाल्यानंतर तिच्या कुटूंबियांनी यासंदर्भात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. मात्र, यातील आरोपीच्या नातेवाईकांनी मुलीनेच आमच्या मुलास फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केल्याची माहिती मुलीच्या कुटूंबियांनी दिली आहे. त्यामुळे ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ असा पेच निर्माण झालेला आहे.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |