कराड : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गोटे (ता.कराड) येथे झालेल्या तिहेरी अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज (शनिवारी) पहाटे 4 च्या सुमारास झाला.
बाबुराव बिरू माने (रा.पेड ता.तासगाव जि.सांगली) असे तिहेरी अपघातात मयत झालेल्याचे नाव आहे. तर सयाजी रामचंद्र जमाले (वय 56 रा.मुंढे), भाऊसाहेब रामचंद्र येडे (रा.बीड) असे गंभीर जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर कराड येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गोटे गावच्या हद्दीत आज पहाटे 4 च्या सुमारास पुढे चाललेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून आयशर टॅम्पोने धडक दिली. या अपघातानंतर आयशर टॅम्पो चालक व ट्रॅक्टर चालकामध्ये रस्त्यावरच वादावादी सुरू झाली. ही वादावादी चालू असतानाच अचानक पाठीमागुन भरधाव आलेल्या ट्रकने या दोन वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रकने वादावादी करणार्यांनाही ठोकर दिली. या अपघातात आयशर टेम्पो चालक बाबुराव माने याचा मृत्यू झाला. तर भाऊसाहेब येडे व ट्रॅक्टर चालक सयाजी जमाले हे दोघेजण गंभीर जखमी झाले. या तिहेरी अपघातात तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर ट्रक ड्रायव्हरने घटनास्थळावरून पोबारा केला. अपघाताची खबर मिळताच घटनास्थळी तात्काळ हायवे हेल्पलाईनचे कर्मचारी दत्तगीर आगा, अमित पवार, योगेश पवार तसेच कराड शहर पोलिस स्टेशनचे प्रशांत जाधव व महामार्ग पोलिस मदत केंद्राचे कर्मचारी दाखल झाले त्यांनी वाहतुक सुरळीत करीत अपघातातील जखमींना तात्काळ खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघाताची नोंद कराड शहर पोलिसात झाली आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |