01:17am | Apr 13, 2018 |
सातारा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलिस दल सतर्क असून दोन्ही उत्सव शांततेत पार पाडणे हे शांतता कमिटी सदस्यांसह सर्वांची जबाबदारी आहे. कायदा व सुव्यवस्था प्रश्न ऐरणीवर आल्यास प्रसंगी कोणाचीही गय केली जाणार नाही. दरम्यान, कराड, फलटण व वाई येथे एकच मिरवणूक निघत असताना सातारा येथेही एकच मिरवणूक निघावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले.
सातारा येथील अलंकार हॉलमध्ये गुरुवारी सायंकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व शिवजंयतीच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक झाली यावेळी पोलिस अधीक्षक संदीप पाटील बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, अतिरीक्त जिल्हा पोलिस प्रमुख विजय पवार, प्रांताधिकारी स्वाती देशमुख, मुख्याधिकारी शंकर गोरे उपस्थित होते.
संदीप पाटील पुढे म्हणाले, प्रत्येक सण, उत्सव साजरे होत असताना त्यामुळे दुसर्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. जिल्ह्यात केवळ सातारा शहरात विविध मिरवणूका निघतात. यामुळे आपण एकच मिरवणूक का काढू शकत नाही? याचे चिंतन करण्याचे गरज निर्माण झाली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. उत्सव साजरा होत असताना कुठेही गैरप्रकाराची माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्या, असे आवाहनही करण्यात आले. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल म्हणाल्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व शिवजयंती उत्साहात साजरी करताना प्रत्येकाने कायदा व सुव्यवस्थाही अबाधित राहिली पाहिजे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. हे दोन्ही उत्सव साजरे करताना कायद्याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार.
दरम्यान, यावेळी सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी आपआपली बाजू मांडली. यामध्ये प्रामुख्याने सातार्यातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनल्याने त्याबाबत ठोस उपाययोजना करावी. प्रत्येक सण- उत्सव तोंडावर आल्यानंतर प्रशासन बैठका घेत असून हे चुकीचे आहे. बैठकीत निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या अंमलबजावणीसाठी किमान वेळ मिळाला पाहिजे. प्रत्येक उत्सवावेळी मद्यप्राशन करुन येणार नाही व ट्रिपलसीट दुचाकी वाहने चालवली जाणार नाहीत याची खबरदारी घेतली जावी, अशा विविध सूचना उपस्थित नागरिकांनी मांडल्या.
यावेळी नरेंद्र पाटील, श्रीकांत शेटे, सुनील कोळेकर, दादा ओव्हाळ, अमोल बनसोडे, राजेंद्र चोरगे उपस्थित होते. दरम्यान, प्रमोद पोळ यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तके जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक तसेच व्यासपीठावरील मान्यवरांना भेट दिली.
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |