सातारा : राजकारणात मी कुणाच्या आधारावर नाही, मी माझ्या हिमतीवर आहे, असे ठासून सांगत खासदार उदयनराजे भोसले यांनी येथे पक्षांतर्गत विरोधकांना फटकारले. त्याचवेळी पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याविषयी आपणास आदर असून तो राहणारच, असे त्यांनी सांगितले.
राजधानी सातारा महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना आपल्या खास शैलीत उत्तरे देत फटकेबाजी केली. कधी निळू फुले, तर कधी अक्षय कुमारची नक्कल करत डायलॉग मारले. राष्ट्रीय राजकारणात छत्रपतींचे वंशज म्हणून लोकप्रिय असल्यामुळे राष्ट्रवादीत आपले स्थान आहे का या प्रश्नावर त्यांनी उपरोक्त उत्तर दिले.
नौटंकीचा आरोप करणाऱ्यांचा त्यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला. हो, मी करतो नौटंकी. इलेक्शन असो वा नसो, मी कॉलर उडवतच असतो. माझा स्वभाव आहे तो आहे. मी माझ्या स्वभावात बदल का करू ? टवाळकी करणाऱ्यांना मी भीकपण घालत नाही. जे बोलतात त्यांच्यात दम असेल तर त्यांनी समोरासमोर येऊन बोलावे. वयामुळे गप्प बसतो. पण माझ्यासारखे कोणी वाईट नाही, अशा कडक शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावले. कामे करायला तुमचे हात कोणी बांधले आहेत का ? मग का काही केले नाही ? मी सत्तेत होतो, नव्हतो. पण कामे करत राहिलोच ना ? अशी सरबत्ती त्यांनी केली.
रयत शिक्षण संस्थेत राजघराण्याला सन्मानपूर्वक प्रतिनिधीत्व दिले जात नसल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. संस्थेसाठी राजघराण्याने जागा दिली. ज्यांना संस्थेत घेतले त्यांचे संस्थेसाठी काय योगदान ? जागा कोणाची ? कोण संस्थेमध्ये घेतले याचा कधी कोणी विचार केलाय ? आपणास नाही, शिवेंद्रला घ्या, कुणालाही घ्या. पण कुणाला घेतले ? प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी, शशिकांत शिंदे यांना घेतले. यांनी काय योगदान दिले ? घेताना काय निकष लावले ? असे सवाल त्यांनी केले.
निळुभाऊ, सलमानची नक्कल :
पत्रकार परिषदेला तुम्ही आलेच पाहिजे असे संयोजक आपणास म्हणाल्याचे सांगत खासदार उदयनराजे यांनी यावेळी, 'त्येच्या मायला, प्रेस तुम्ही नाही घ्यायची तर कोण घेणार ?' या डायलॉगवर निळू फुले यांची नक्कल केली. त्याचवेळी आपण कलाकारांच्या पाठीशी ठामपणे राहणार असल्याचे सांगताना त्यांनी सलमान खानचा, 'एक बार जो मैने कमिटमेंट कर ली, तो मै अपने आपकीभी नही सुनता !' हा डायलॉग मारला.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |