12:26am | Aug 20, 2018 |
कराड : दर दोन वर्षांनी बसस्थानक परिसरात करावे लागणारे डांबरीकरण, त्यावर येणार सातत्याचा खर्च, पडणारे खड्डे यावर कायम स्वरूपी पर्याय म्हणून राज्यातील सर्व बसस्थानक परिसरात काँक्रेटीकरण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यानुसार दोनशे बसस्थानकांचे काँक्रेटीकरणाचे काम प्रगती पथावर आहे. तसेच गेल्या चार वर्षापासून रखडलेले कराड बसस्थानकाचे काम तातडीने पुर्ण करून येत्या तीन महिन्यात उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
दरम्यान, ना. रावते यांनी कराड बस स्थानकाची फिरून पाहणी केली. अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते प्रा. नितिन बानगुडे-पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम, प्रादेशिक परिवहन आधिकारी अजित शिंदे उपस्थित होते.
ना. दिवाकर रावते म्हणाले, गेल्या पन्नास वर्षाच्या तुलनेत गेल्या चार वर्षात राज्यातील सर्व बस स्थानकांचे रूपडे पालटण्याचे काम आम्ही केले आहे. राज्यातील बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना सर्व सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी पहिल्यांना नादुरूस्त व दुरावस्था झालेल्या सर्व बस स्थानकांचे काम हाती घेण्यात आले आहे. यापूर्वी बसस्थानक परिसरातील गाडी उभी राहणारे ठिकाणे तसेच नेहमी वर्दळीच्या ठिकाणी पडणारे खड्डे मुजवणे पुन्हा पुन्हा तेच ते काम तसेच जर दोन वर्षांनी करावे लागणारे डांबरीकरण, त्यावर येणार सातत्याचा खर्च, यावर कायम स्वरूपी पर्याय म्हणून राज्यातील सर्व बसस्थानक परिसरात काँक्रेटीकरण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यानुसार दोनशे बस स्थानकांचे काँक्रेटीकरणाचे काम प्रगती पथावर आहे. त्यामुळे येत्या पंधरा ते वीस वर्ष याकडे पहावे लागणार नाही. कराडलाही या निर्णयानुसार कॉक्रेटीकरण सुरू आहे.
ते म्हणाले, आम्ही काही निर्णय बदलल्याने कराड बस स्थानकाचेही काम लांबणीवर पडले. या बस स्थानकाचे काम तातडीने मार्गी लावण्यात यावे, अशी विनंती माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. त्यांच्या विनंतीनुसार कामाला गती देण्यात आली आहे. पुढील तीन महिन्या बस स्थानकाचे काम पूर्ण करून कराड बस स्थानकाचे उद्घाटन घेतले जाणार आहे.
शिवशाहीमधून लवकरच प्रत्रकारांचा प्रवास
अधिस्वीकृती पत्रकारांना शिवाशाहीमध्ये प्रवास कधी करता येणार या प्रश्नावर बोलताना रावते म्हणाले, अधिस्वीकृती पत्रकारांना राज्य परिवहन महामंडळाच्या अन्य बस मधून जसा प्रवास करण्याची सवलत देण्यात आली आहे तशीच सवलत शिवशाही बसमध्ये देण्याच्या निर्णयला मी मान्यता दिली आहे. मात्र याबाबतचा अंतरिम निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत लवकरच घेतला जाणार असल्याचे ना. रावते यांनी सांगितले.
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |