कराड : कारखाली सापडून सहा वर्षीय मुलगी जागीच ठार झाल्याची घटना घटना सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास सोमवार पेठेत घडली. सई सचिन वाडेकर (वय 6 वर्षे, रा. सोमवार पेठ, पालकर शाळेजवळ, कराड), असे मुलीचे नाव आहे. अपघातानंतर जमावाने कार चालकास चोप दिला. अपघातग्रस्त कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून चालक निसर्ग अरूणकुमार शहा (वय 22, रा. रूक्मिणीनगर, कराड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सचिन वाडेकर हे पत्नी, मुलगा व मुलगी सई यांच्यासह सोमवार पेठेत राहतात. ते फुलाच्या दुकानात काम करतात. त्यांची मुलगी सई पालकर शाळेत पहिलीच्या वर्गात शिकत होती. सोमवारी रात्री ती मंदीरासमोर मैत्रिणीशी बोलत उभी राहिली होती. त्यावेळी संशयीत निसर्ग शहा हा मोबाईलवर बोलत कार सुरू करून वळवत होता. वेगाने कार वळविताना कारची सईला जोराची धडक बसली. या धडकेत रस्त्यावर आपटून सई कारच्या चाकाखाली सापडली. सईच्या मैत्रिणीने तिला बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सई गंभीररित्या जखमी झाली होती. त्याच अवस्थेत तिला रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याच्या अपघात विभागाचे खलील इनामदार, प्रशांत जाधव तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठवला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अपघातग्रस्त कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून चालक निसर्ग अरूणकुमार शहा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, कृष्णाघाट परिसरात रात्री उशीरापर्यंत गर्दी असते. साडे नऊ वाजता अपघात झाल्यामुळे तेथे जमाव जमला आणि जमावाने कार चालकाला चोप दिला. त्यानंतर तो रूग्णालयात अॅडमिट झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी अजुन त्याला ताब्यात घेतलेले नाही.
कृष्णा घाटावर पेट्रोलिंगची गरज...
प्रीतिसंगम आणि कृष्णा घाटावर अबालवृध्दांची दिवसभर गर्दी असते. अनेक शाळा, महाविद्यालयांच्या सहलीसुध्दा येत असतात. खाद्य पदार्थांचे गाडे, खेळणी, घोडेस्वार, लहान मुलांना फिरविणार्या छोट्या टॅक्सी, यामुळे कृष्णाघाटाचा परिसर गर्दीने फुललेला असतो. या परिसरात भरधाव दुचाकी चालविणार्या टवाळखोरांचा उच्छाद असतो. त्यामुळे अपघात, मारामारीच्या घटना सातत्याने घडत असतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा, गुंडा विरोधी पथक, निर्भया पथकाकडून दिवसभर प्रीतिसंगम आणि कृष्णा घाट परिसरात पेट्रोलिंगची आणि टवाळखोरांवर कारवाईची गरज आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |