04:00pm | Jan 14, 2020 |
विडणी : महाड-पंढरपूर महामार्गावर पिंप्रद येथे पहाटे फिरायला निघालेल्या पती, पत्नीला अज्ञात वाहनाने जोरदार ठोकर दिली. या अपघातामध्ये दोघेही ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
पिंप्रद (ता. फलटण) येथील टायगर जिमचे मालक किसन मारुती बोराटे (वय 51) व त्यांच्या पत्नी छाया किसन बोराटे (47) हे दोघे नेहमीप्रमाणे आजही (सोमवारी) पहाटे 6 च्या सुमारास महाड-पंढरपूर महामार्गावरून फिरायला जात होते. मात्र, पिंप्रदनजीकच राजीव दीक्षित गुरुकुल कमानीजवळ आले असता फलटणच्या दिशेने निघालेल्या एका अज्ञात वाहनाने दोघांनाही जोरदार धडक दिली. यामध्ये दोघेही ठार झाले. ते वाहन तेथून पसार झाले. अपघातावेळी अंधारच असल्याने अज्ञात वाहन सापडले नाही.
या अपघातात दोघांनाही जोरदार धडक बसल्याने छाया बोराटे या जागीच ठार झाल्या तर किसन बोराटे यांचा फलटण येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने पिंप्रद गावावर शोककळा पसरली असून, या घटनेमुळे संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार असून या घटनेमुळे बोराटे कुंटुंबावर
दुःखाचा डोंगर कोसळला असून हे दोघेही मनमिळावू स्वभावाचे होते.
या घटनेची नोंद पिंप्रदचे पोलिस पाटील सुनील बोराटे यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात केली असून तपास पीएसआय कदम करत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |