मुंबई : मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक, कुख्यात गॅंगस्टर एजाज लकडावालाला मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. बिहारच्या पाटण्यातून एजाज लकडावालाला पकडण्यात आलं. पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं असता, कोर्टाने त्याला 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
खार येथील एका बांधकाम व्यावसायिकाला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याप्रकरणी एजाज विरोधात खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास खंडणी विरोधी पथकाकडून सुरु होता. याप्रकरणात एजाज याचा भाऊ अकील लकडावाला यालाही अटक करण्यात आली होती.
एजाज लकडावालाच्या मुलीला काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर अटक केली होती. ती बोगस पासपोर्टवर देश सोडून जात होती. तिला अटक केल्यानंतर तिच्याकडे केलेल्या तपासात एजाज लकडावालाची माहिती उघड झाली होती. त्याद्वारे एजाज लकडावाला याचा माग काढून पोलिसांनी त्याला पाटणा येथून अटक केली.
एजाज लकडावालावर जवळपास 25 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. एजाज लकडावाला हा दाऊदचा अत्यंत जवळचा सहकारी होता. मात्र दाऊदसोबतच्या वादानंतर तो गँगस्टर छोटा राजनच्या टोळीत गेला होता. मुंबईत झालेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये लकडावालाचा सहभाग होता. वर्ष 2003 मध्ये एजाज लकडावालाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. मात्र तो बँकॉकवरुन कॅनडाला पळून गेला होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो तिथेच होता. लकडावालाने छोटा राजनशी हातमिळवणी केल्याने दाऊद नाराज असल्याची चर्चा होती.
दरम्यान, यापूर्वी पोलिसांनी लकडावालाची मुलगी सोनिया लकडावाला उर्फ सोनिया शेखला शुक्रवारी रात्री मुंबई विमानतळावरुन अटक केली होती. सोनिया बनावट पासपोर्टच्या आधारे नेपाळला जाण्याच्या तयारीत होती. त्यावेळी पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन एजाज लकडावालाची माहिती मिळवली. एजाज हा छोटा राजन गॅंगमध्ये होता. त्यापूर्वी तो दाऊद गॅंगमध्ये होता. छोटा राजनवर हल्ला झाल्यानंतर तो छोट राजन गॅंगमधून वेगळा झाला होता. त्याच्याविरोधात 27 गुन्हे दाखल आहेत. शिवाय सुमारे 80 तक्रारी आहेत. देशाच्या विविध राज्यातही लकडावालाविरोधात गुन्हे दाखल आहेत.
मुंबई पोलीस अनेक महिन्यांपासून शोध घेत होते. त्याच्या मुलीला 28 डिसेंबर रोजी अटक केली होती. ती सोनिया मनीष अडवाणी या बोगस नावाने पासपोर्ट बनवून नेपाळला निघाली होती. त्यावेळी तिला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. त्याच्या मुलीला अटक केल्यावर पोलिसांना एजाज लकडावालाविरोधात अनेक माहिती मिळाली. एजाज लकडावाला हा 8 जानेवारी रोजी बिहारमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तयारी केली होती. पोलिसांनी बिहारमधीळ पाटण्यातील जनकपूर इथे लकडावालाला अलगद पकडला. काल रात्री त्याला मुंबईत आणून अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |