RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

घटस्फोटीत महिलेवर बलात्कार ; सातारा जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

11 July 2019 at 01:04

सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील वरीष्ठ सहाय्यक कर्मचारी गोपीचंद तानाजी पवार (रा.अमरलक्ष्मी स्टॉप, एमआयडीसी, सातारा) याच्याविरुध्द घटस्फोटीत महिलेवर बलात्कार व महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

या प्रकरणातील तक्रारदार महिला 33 वर्षाची आहे. महिलेचा 2005 मध्ये विवाह झालेला होता. 2017 मध्ये मात्र पतीसोबत पटत नसल्याने महिला माहेरी आली होती. त्यावेळी संशयित गोपीचंद पवार याची व महिलेची ओळख झाली. महिलेचे पतीसोबत पटत नसल्याचे गोपीचंद याला समजल्यानंतर त्याने ‘महिलेला पती सोबत राहू नकोस. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुला नोकरीला लावतो. तुझ्या मुलांनाही सांभाळतो,’ असे म्हणून महिलेचा विश्‍वास संपादन केला.

एप्रिल, मे 2018 मध्ये गोपीचंद पवार याने महिलेला फोन करुन पतीबाबत बोलायचे असल्याचे सांगून त्याच्या घरी बोलावले. महिला घरी गेल्यानंतर त्याने पतीसोबत घटस्फोट घेण्याचा सल्ला देवून तुझ्याशी लग्न करतो, असे खोटे सांगून महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला. तेथून पुढे त्याने वेळोवेळी ठिकठिकाणी  लग्न करतो, असे सांगून बलात्कार केला. तो लग्नाबाबत काहीच बोलत नव्हता. महिलेने त्याबाबत विषय काढल्यानंतर अगोदर पतीशी घटस्फोट घे, तुला नोकरीला लावली की मग तुझ्याशी लग्न करतो, असे सांगून लग्नाची टाळाटाळ करायचा.

तक्रारदार महिलेने पतीसोबत गेल्याच जून 2019 मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटाची प्रक्रिया झाल्यानंतर महिलेने गोपीचंद पवार याला लग्न करण्यासाठी सांगितल्यानंतर त्याने चारचाकी कारमधून फिरायला नेले. यावेळी संशयिताने महिलेला तिच्याशी लग्न करणार नसल्याचे सांगून दमदाटी केली. या घटनेमुळे महिला घाबरली. नोकरीचे खोटे आश्‍वासन देवून बलात्कार केल्याने अखेर महिलेने शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर संशयितावर बलात्कार व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 जावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी

गेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.

4 hours before

एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा

कराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4 hours before

तलावात बुडून युवकाचा मृत्यू

बामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.

4 hours before

सातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी

सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

4 hours before