03:02pm | Feb 13, 2020 |
सातारा : रयत सायन्स व इनोव्हेशन सेंटर या रयत शिक्षण संस्थेच्या वर्ये ता सातारा येथील केंद्राचा उद्घाटन समारंभ दि. 14 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी बारा वाजता होणार आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार व ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते या ऍक्टिव्हिटी सेंटरचे उद्घाटन होणार असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले, रयत सायन्स व इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटर हे राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन यांच्या माध्यमातुन मंजूर झाले आहे. यासाठी राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्याकडून अडीच कोटी व रयत शिक्षण संस्थेकडून दीड एकर जागा व दीड कोटी रुपयांचे अर्थसहाय्य या प्रकल्पाला झाले आहे. या केंद्र उभारणीमध्ये होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन मुंबई यांचा सहभाग आहे. या कक्षामध्ये अनुक्रमे सायन्स गॅलरी, इनोव्हेशन हब व ऍक्टिव्हिटी सेंटर, इनडोअर आऊटडोअर एक्झिबीटस, विविध मॉडेल व विज्ञान खेळणी या केंद्राच्या प्रांगणात उभारण्यात आली आहे. जीएसएलव्ही अंतराळ यानाची वीस फुटी उंचीची हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दुसरे विज्ञान केंद्र अशी या केंद्राची ओळख राहणार असून नेहरू सायन्स सेंटरच्या धर्तीवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात विद्यार्थी स्वतः संशोधन करून उपकरणांची निर्मिती करतील. सातारा शहर व परिसरातील पाच हजार विद्यार्थ्यांचे केंद्र भेटीसाठी रजिस्ट्रेशन झाले असून पन्नास पेक्षा अधिक शाळा या केंद्राशी जोडल्या जाणार आहेत. हे सेंटर ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी खुले राहणार आहे. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचे मार्गदर्शन या प्रकल्पाला लाभले असून (National Council for science Musium) यांची आर्थिक मदत झाली आहे. रयतच्या माध्यमातून idea to patent या धर्तीवर सेंटरमध्ये काम केले जाणार आहे.
तसेच रयत इंग्लिश मिडीयम स्कूल चे नामकरण कर्मवीर भाऊराव पाटील यांचे चिरंजीव अप्पासाहेब भाऊराव पाटील यांच्या नावाने केले जाणार आहे. 1960 ते 2007 अशी सत्तेचाळीस वर्ष अप्पासाहेबांनी रयत शिक्षण संस्थेची धुरा वाहिली. सायन्स सेंटरचे उद्घाटन व रयत इंग्लिश मिडियम स्कूलचे नामकरण या कार्यक्रम सोहळ्याला मॅनेजिंग कमिटी सदस्य डॉ. एन डी पाटील, दिलीप वळसे पाटील, नामदार विश्वजीत कदम, रामशेठ ठाकूर, राजीव गांधी सायन्स कमिशन सचिव अनिल मानेकर, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र संचालक डॉ. कृष्णा स्वामी सुब्रमण्यम, नेहरू सायन्स सेंटरचे शिवप्रसाद खेणेद, होमी भाभा सेंटरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ नरेंद्र देशमुख, सेंटरचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अरूण सप्रे, इ मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहे. या कार्यकमास सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे यांनी केले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |