01:29am | Oct 17, 2018 |
कराड : सांगलीतील गर्भपात प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात तांबवे (ता. कराड) येथील एकास अटक करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. त्याच्यावर सांगलीतील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. सुजीत दिलीप कुंभार (वय 29), असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे तांबवे गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबतची माहिती अशी, सांगलीमधील दोन डॉक्टरांना गर्भपातप्रकरणी अटक करण्यात आली होती. डॉक्टरांना गर्भपाताच्या गोळ्या पुरविल्याच्या आरोपावरून तांबवे (ता. कराड) येथील सुजित कुंभार यास दि. 22 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. तो औषध कंपनीचा प्रतिनिधी (एम. आर.) म्हणून नोकरी करत होता. दरम्यान, या गुन्ह्यात न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यास न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यानंतर दुसर्याच दिवशी त्याची प्रकृती बिघडली. त्यास रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. पोट फुगायला लागले. त्यामुळे आठ दिवसांपूर्वी त्याला सांगली शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सांगली पोलीस दलात खळबळ उडाली. मंगळवारी रात्री कार्यकारी दंडाधिकार्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले.
गर्भपात प्रकरणात 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत बुधवारी (दि. 17) संपणार होती. त्यामुळे उद्या (बुधवारी) सुजितचा जामीन अर्ज न्यायालयात दाखल केला जाणार होता. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. सुजित हा विवाहित होता. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, लहान मुलगी, चुलते, असा परिवार आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |