कराड : गेली दहा-बारा दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णा, कोयना व पंचगंगा आदि नद्यांना आलेल्या महापुरामुळे सांगली, कोल्हापूर व सातारा जिह्यात गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे या पूरामुळे मनुष्यहानी बरोबर घरे, जमीन, पीके यांचे आतोनात नुकसान झालेले आहे व अजूनही सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामधील कांही गांवामधील ग्रामस्थ पुराच्या विळख्यात आहेत. या पुरग्रस्तांना आर्थिक मदतीबरोबरच, जीवनावश्यक वस्तूची मदत होण्याकरीता माजी केंद्रीय कृषि मंत्री शरदरावजी पवारसाहेब यांचे सूचनेनुसार सह्याद्रि कारखाना कार्यस्थळावर पूरग्रस्तांच्या सर्वोतपरी मदतीसाठी मदत कक्ष केंद्र उघडलेले आहे. सद्या कारखाना कार्यक्षेत्रामधून पूरग्रस्त भागासाठी मदतीच ओघ सुरू असून ज्या ज्या गांवांना मदत द्यावयाची आहे त्यांनी रोख रक्कम, नवीन कपडे, धान्य, पाण्याच्या बॉटल्स आदि वस्तू सह्याद्रि सहकारी कारखाना कार्यस्थळावरील पूरग्रस्त मदत कक्षामध्ये जमा कराव्यात. त्या वस्तू गरजूपर्यंत नियोजन बध्द रितीने आमदार श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पोहोच केली जाणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी दिली.
आबासाहेब पाटील पुढे म्हणाले की, सह्याद्रि च्या कामगारांनी पूरग्रस्तांचे मदतीसाठी एक दिवसाचा पगार देणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी विचारात घेवून, पूरग्रस्त भागामधील कांही गांवामधील स्वच्छतेकरीता 50-50 कर्मचार्यांच्या 3 टीम तयार केलेल्या असून उद्या पासून सह्याद्रिचे कर्मचारी स्वच्छतेचे कामासाठी पूरग्रस्त भागामध्ये जाणार असल्याचे आर्वजून सांगितले.
तसेच कारखाना कार्यक्षेत्रामधील कृष्णा नदीवर असलेल्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्यांची पुरामुळे झालेल्या हानीची पहाणी करून बंधार्यामध्ये लाकडे, अन्य वस्तू अडकलेल्या आहेत; त्यामुळे बंधार्याचे अधिक नुकसान होऊ नये; म्हणून त्याचीही सङ्गाई करण्यासाठी इंजिनिअरींग विभागातील एक टीम काम करणार असल्याचे सांगितले. त्याशिवाय ज्या कर्मचार्यांना जीवनावश्यक वस्तू, नवीन कपडे पूरग्रस्तांना द्यावयाच्या आहेत. त्यांनी कारखान्यावर उघडलेल्या पूरग्रस्त मदत कक्षामध्ये जमा कराव्यात असेही आवाहन केले.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |