कराड : येथील शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने दुचाकी चोरणार्या दोघा अल्पवयीन मुलांसह चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीच्या 23 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. त्यांच्याकडून आणखी 15 दुचाकी हस्तगत होण्याची शक्यता असून चोरीच्या दुचाकी विकत घेणारेही पोलिसांच्या रडारवर आहेत. दरम्यान, चौघांपैकी दोन अल्पवयीन असून एकास न्यायालयात हजर केले असता त्याला दि. 22 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शशिकांत रघुनाथ कांबळे (रा. तांदूळवाडी ता. वाळवा. जि. सांगली), असे त्याचे नाव आहे. अमोल अधिकराव कारंडे (वय 28, रा. कुंभारगाव, ता. पाटण), असे दुसर्या संशयिताचे नाव आहे.
कराड, मलकापूर, सैदापूर परिसरातून दुचाकी चोरीस जाण्याच्या घटना वाढत होत्या. त्यामुळे स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी दुचाकी चोरीस जात असलेल्या ठिकाणी पाळत ठेऊन होते. पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांच्या सुचनेनुसार दुचाकी चोरीस जाणार्या ठिकाणांची यादी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी तयार केली होती. त्या ठिकाणी पोलिसांची गस्तही वाढविण्यात आली होती. रविवारी (दि. 18) हवालदार सुनिल पन्हाळे यांना सह्याद्रि हॉस्पिटल परिसरात काही जण संशयास्पदरित्या फिरत असल्याचे समजले. त्यांनी त्या परिसरात गस्त घालणार्या हवालदार नितीन येळवे, हवालदार प्रदीप कदम यांना फोनवरून माहिती दिली. सह्याद्रि हॉस्पिटल परिसरात तपासणी करत असताना शशिकांत रघुनाथ कांबळे (रा. तांदूळवाडी ता. वाळवा. जि. सांगली) हा संशयित हाती लागला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील दुचाकीच्या कागदपत्रांची विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला पोलीस ठाण्यात आणून सहाय्यक पोलीस निरीक्षक लोखंडे यांनी चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याने आणखी दुचाकी चोरल्या असाव्यात, असा संशय बळावल्याने स्वप्नील लोखंडे यांनी त्याच्याशी संबधित असणार्यांकडून माहिती घेतली असता कांबळे हा अट्टल दुचाकी चोरटा असल्याची माहिती समोर आली. चार दिवस चौकशी केल्यानंतर त्याने तब्बल 17 दुचाकी चोरून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकात विकल्याची कबुली दिली. त्यापैकी 15 दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांन यश आले आहे.
दरम्यान, 19 नोव्हेंबर रोजी कृष्णा हॉस्पिटल परिसरात हवालदार राजेंद्र पुजारी आणि पोलीस नाईक संजय जाधव हे पेट्रोलिंग करत होते. त्यांना दुचाकी घेऊन निघालेला एक संशयित सापडला. चौकशीवेळी ते गडबडला. अमोल अधिकराव कारंडे (वय 28, रा. कुंभारगाव, ता. पाटण जि. सातारा), असे त्याचे नाव असल्याचे समोर आले. त्याच्यासोबत एक अल्पवयीन मुलगा होता. चौकशी दरम्यान त्यांनी आत्तापर्यंत 12 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. चोरीच्या दुचाकी ढेबेवाडी परिसरात विक्री केल्याचेही सांगितले. त्यांच्या आणखी एका अल्पवयीन साथीदारास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयितांकडून आतापर्यंत 8 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. अजून पाच दुचाकी हस्तगत करायच्या आहेत.
पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, हवालदार राजेंद्र पुजारी, सतीश जाधव, प्रदीप कदम, नितीन येळवे, जयसिंग राजगे, संपत भोसले, पोलीस नाईक सचिन साळुंखे, संजय जाधव, प्रमोद पवार, सचिन गुरव, विनोद माने, प्रफुल्ल गाडे, मारूती लाटणे, आनंदा जाधव यांनी ही कारवाई केली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |