03:20am | Sep 18, 2019 |
सातारा : जिल्ह्यातील गरीब, सोशित, वंचित लोकांच्या हक्काचे असणारे जिल्हा रुग्णालय सध्या भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. सातारा जिल्हा रुग्णालयात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराची लक्तरे परवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे वेशीवर टांगली गेली असूनही जिल्हा रुग्णालयाच्या भ्रष्ट कारभारात काडीमात्र फरक पडलेला दिसत नाही. परंतू असे असूनही जिल्ह्याचा गाडा हाकणार्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल मात्र याकडे कानाडोळा करीत असल्यामुळे जिल्हाभरात संतापाची लाट उसळलेली आहे. इतर भानगडीत लक्ष घालणार्या कलेक्टर बाईंनी जिल्हा रुग्णालयातही लक्ष घालावे, अशी मागणी जिल्ह्यातील गरीब, सोशित, वंचित लोकांकडून होऊ लागली आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय सर्वसाधारण रुग्णालय खरेतर गरीबांचा, सोशित, वंचितांच्या आरोग्याचा आधार आहे. ज्याला कोणी वाली नाही, त्याला सातारचे सिव्हिल हॉस्पिटल, असे चित्र पूर्वी दिसायचे. तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी जिल्हा रुग्णालयाची घडी व्यवस्थित बसवली होती. खाजगी रुग्णालयांना लाजवेल असे जिल्हा रुग्णालय होते. परंतू डॉ. जगदाळे यांची नाशिक येथे बदली झाल्यानंतर त्यानंतर आलेल्या शल्य चिकित्सकांनी सातारा रुग्णालयाचे अक्षरश: वातेरे करुन टाकले. जिल्हा रुग्णालयावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने 'हम करे सो कायदा', अशी परिस्थिती आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी सुब्बराव पाटलांपासून अश्विन मुद्गलांपर्यंत सर्व जिल्हाधिकारी सिव्हिलच्या कामकाजाकडे जातीने लक्ष घालत होते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयावर जिल्हाधिकार्यांचा वॉच असल्यामुळे जिल्हा रुग्णालयातील सर्वच विभाग चांगल्या पद्धतीने कार्यरत होते. परंतू गेल्या तीन वर्षात जिल्हा रुग्णालयावर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचे लक्षच नसल्यामुळे जिल्हा रुग्णालयात अक्षरश: बजबजपुरी झालेली दिसून येत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर जिल्हा रुग्णालय चालविण्यात नापास झाले आहेत. त्यांच्या जवळच्या समजल्या जाणार्या राजे नावाच्या कारकुनावर परवा 40 हजारांच्या लाचेप्रकरणी सातारा येथील एसीबीची कारवाई झालेली आहे. या कारवाईचा ससेमिरा डॉ. गडीकर यांच्याही मागे लागला आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचे रुग्णसेवेपेक्षा मलिद्याकडेच जास्त लक्ष असल्यामुळे रुग्णांचे हाल होवू लागले आहेत. जिल्हा रुग्णालयात पुरेसे वैद्यकीय अधिकारी, औषधे, तंत्रज्ञ, कर्मचारी याची वाणवा आहे. पूर्णवेळ फिजिशियन नसल्याने अनेक महत्त्वाच्या आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया याठिकाणी होत नाहीत. ज्या होताहेत त्या सदोष पद्धतीने होताहेत. अशा घटना दोन दिवसांपूर्वीच उघडकीस आल्या आहेत.
मुळात सरकारी दवाखान्यात येणारा माणूस खाजगी रुग्णालयाची सेवा परवडत नाही म्हणून इकडे येत असतो. पण त्याचीच पदोपदी अडवणूक व पिळवणूक करताना येथील डॉक्टर व कर्मचार्यांमध्ये कसलीच संवेदनशीलता दिसून येत नाही. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचारी इतके निष्ठूर कसे, असा प्रश्नही येथे येणार्या रुग्णांना व त्यांच्यासोबत येणार्या आप्तेष्टांना पडलेला असतो. जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन तसेच तत्सम यंत्रणा बंद ठेवून कुजवणे व रुग्णांना खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांच्या दाढेला देणे नित्याचेच झाल्याने खाजगी डॉक्टर्स व जिल्हा रुग्णालयाचे साटेलोटे चव्हाट्यावर आले आहे. एकूणच जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांचे जगणे असह्य झालेले आहे. गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्हा रुग्णालयाच्या नवनवीन भानगडी रोजच बाहेर येत आहेत. असे असताना जिल्हाधिकारी या नात्याने आपण काहीतरी केले पाहिजे, ही भावना जिल्हाधिकार्यांच्या मनाला कशी शिवत नाही? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
परवा सातार्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा 'आप'चे जिल्हा संयोजक सागर भोगांवकर यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. कदाचित या आरोपांमुळे भांबावलेल्या जिल्हाधिकार्यांना सातारा जिल्हा रुग्णालयाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, अशा चर्चाही सातारा जिल्ह्यात झडत आहेत.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |