12:47am | May 05, 2018 |
सातारा : मोक्कामधील संशयित आरोपी कुख्यात गुंड दत्ता जाधव याला सातारा पोलिसांनी शुक्रवारी रात्री प्रतापसिंहनगर येथून अटक केली. या घटनेनंतर परिसरासह सातार्यात खळबळ उडाली असून त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिस व्हॅन बिघडल्याने सातार्यातून चालवत पोलिस ठाण्यापर्यंत आणले. दरम्यान, गेल्याच आठवड्यात जत येथे त्याला पकडण्यासाठी गेलेल्या सातारा, सांगली पोलिसांवर तुफान दगडफेक केल्याने पोलिस दलालाच आव्हान दिल्याचे स्पष्ट झाले होते.
गुंड दत्ता जाधव याच्याविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यासह इतर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. सावकारी प्रकरणी नुकताच त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल झालेला आहे. सावकारीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी मोक्काअंतर्गंत प्रस्ताव तयार करुन तो कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठवला. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी त्याच्यावरील मोक्काचा हिरवा कंदील दाखवल्यानंतर तो सातार्यातून पसार झाला.
गुंड दत्ता जाधव याच्याविरुध्द मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर सातारा शहर पोलिसांसह जिल्हा पोलिस दल त्याचा शोध घेत होते मात्र तो सातार्यातून पसार झाला होता. गेल्याच आठवड्यात गुंड दत्ता जाधव हा जत येथे असल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाल्यानंतर सातारा व जत जि.सांगली येथील पोलिसांचे पथक त्याला पकडण्यासाठी प्रतापपूर ता.जत येथे रात्री गेले होते. सातारा पोलिसांना पाहताच दत्ता जाधव अंधाराचा व यात्रेचा गैरफायदा घेवून तेथून निसटला.
पोलिसांनी दत्ता जाधव याचा पाठलग करण्याचा प्रयत्न करताच गुंड दत्ता जाधव याच्या साथीदारांनी पोलिसांनाच घेरले. पोलिस दत्ताचा पाठलग करु नये यासाठी जमाव पोलिसांच्या आडवा पडून पोलिसांनाच धक्काबुक्की केली. संशयितांना पोलिसांना पकडताच गुंड दत्ता जाधव याच्या साथीदारांनी पोलिसांना आव्हान देत थेट दगडफेक केली. या घटनेत महिला पोलिसांसह सातारा, सांगली पोलिस जखमी झाले.
पोलिसांनी याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करुन संशयितांची धरपकड केली. गुंड दत्ता जाधव मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी ठरला होता. शुक्रवारी दुपारी मात्र सातारा पोलिसांना दत्ता जाधव बाबतची माहिती मिळाली. याबाबत पोलिसांनी कमालीची गोपनीयता पाळत फलटण, वाठार स्टेशन, एलसीबी येथील अधिकारी व कर्मचार्यांना बरोबर घेवून सापळा रचला. शुक्रवारी संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दत्ता जाधव प्रतापसिंह नगरामध्येच असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी कोंम्बिग ऑपरेशन राबवले. पोलिसांनी परिसराला व त्याला घराला वेढा दिल्यानंतर तो पोलिसांच्या ताब्यात अलगद सापडला.
गुंड दत्ता जाधव सुरुवातीला पोलिसांना बधत नव्हता. त्यातच परिसरात त्याचे साथीदार जमावाने एकत्र जमू लागले. पोलिसांनी धडाकेबाज भूमिका घेत त्याला पोलिस व्हॅनमध्ये घातला. काही अंतरावर गेल्यानंतर पोलिस व्हॅन बिघडल्याने दत्ता जाधव याला खाली उतरवून पायी चालवत सातारा शहर पोलिस ठाण्यापर्यंत आणले.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |