06:02pm | May 19, 2019 |
सातारा : खंबाटकी घाटालगत असलेल्या हॉटेल पार्क इन सहारा समोर आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान उभ्या असलेल्या ट्रकला सातारा बाजूकडून येणार्या बोलेरो जीपने पाठिमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीनजण ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दि. 19 रोजी सकाळी साडेनऊच्या दरम्यान कोकणातून बोरीवली (मुंबई)कडे निघालेली बोलेरो जीप क्र. एमएच 47 एबी 1784 या जीपने हायवे लगत उभा असलेल्या मालट्रक क्र. केएल 16 यु 4420 ला पाठिमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, जागेवरच बोलेरोतील तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये विलास शंकर सामंत (वय 62), बाळकृष्ण शंकर सामंत (वय 67), विनय गंगाधर सामंत (वय 54) सर्व रा. बोरीवली ईस्ट, मुंबई तर स्मिता विनय कामत (वय 72) व बोलेरो जीप चालक रवी गावंकर (वय 35) रा. बोरीवली ईस्ट मुंबई हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शिरवळ येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अधिक उपचारासाठी त्यांना सातारा येथील सर्वसाधारण शासकीय रुग्णालयात आणले जाणार आहे. आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान झालेल्या या अपघातामुळे सातारा-पुणे महामार्गाची दुर्दशा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. आजपर्यंत या परिसरात शेकडो अपघात झाले आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या गलथान कारभारामुळे अशियाई महामार्ग 47 हा मृत्यूचा सापळा बनला आहे. या अपघाताची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाली आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |