12:08am | May 03, 2018 |
महाबळेश्वर : नागपूर येथील हवाला प्रकरणातील सुमारे आडीच कोटी रूपयांचा अपहार करून फरार झालेल्या नागपुर येथील दोन अट्ट्ल गुन्हेगारांसह चार जणांना सातारा शाहुपुरी व गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने ''फिल्मी स्टाईल'' पाठलाग करून महाबळेश्वर येथील मुख्य चौकात जेरबंद करून त्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्यांचेकडुन दोन लाख पन्नास हजार पाचशे रूपये हस्तगत केले असुन उरलेल्या रक्कमेचा तपास करण्यासाठी चारही आरोपींना मध्यरात्री स्थानिक पोलिसांनी नागपुर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे
नागपुर येथील सचिन उर्फ शशांक नारायण पडगीलवार वय 36,रवि रमेश माचेवार वय 35,गजानन उर्फ गजा भोलेनाथ मुगणे वय 29 व प्रकाश बबलु वासनिक वय 22 रा सर्व नंदनवन झोपडपट्टी,नागपुर हे चौघे महाबळेश्वर फिरायला सोमवरी मध्यरात्री साडेबारा एक च्या सुमारास येथे आले त्यांनी मस्जीद रोडवर असलेल्या एका हॉटेलमध्ये त्यांनी रूम घेतला. रात्री आराम केल्या नंतर सकाळी ते फिरण्यासाठी बाहेर पडले महाबळेश्वरची त्यांना काहीच माहीती नसल्याने त्यांनी स्थानिक गाईड सुरेश उगले यांना बरोबर घेऊन महाबळेश्वर मधील प्रसिद्ध मंदिर,ऑर्थरसीट पॉईंटची सैर केल्यानंतर दुपारी ते वेण्णालेक जवळ असलेल्या शिवनेरी ढाब्यावर जेवायला थांबले जेवण करून ते पुन्हा महाबळेश्वरकडे येण्यास निघाले होते.
दरम्यान नागपुर येथील हवाला प्रकरणात रोकडसह हस्तगत केलेल्या वाहनातील अडीच कोटी रूपयांचा अपहार करून फरार झालेले चार आरोपींचे मोबाईल लोकेशन पश्चिम महाराष्ट् दाखवित असुन ते सतत बदलत असल्याची माहीती नागपुर पोलिसांना मिळत होती. त्यांनी ही खबर सातारा जिल्हा गुन्हे अन्वेशन विभागास दिली. या माहीतीबरोबरच आरोपींचे फोटोही पाठविले व त्यांच्या जवळ असलेल्या वाहनाचा नंबरही पाठविला. मोबाईल लोकेशन बदलत असताना सोमवारी रात्री नंतर ते लोकेशन महाबळेश्वर दाखवित असल्याने नागपुर पोलिस आरोपिंच्या शोधासाठी महाबळेश्वरकडे रवाना झाले. ते मंगळवारी दुपारी पुण्यात पोहचले नागपुर पोलिसांनी दिलेली माहीती,गाडीचा नंबर व आरोपींचे फोटो महाबळेश्वर पोलिसांनी येथील अनेक ग्रुपवर पाठविले. नागरीकांच्या सहकार्याने स्थानिक पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान सातारा येथील शाहुपुरी पोलिस ठाण्याचे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे पथक आरोपींच्या शोधासाठी महाबळेश्वरकडे निघाले दुपारी या पथकाला आरोपींचा सुगावा लागला. त्यांनी शहराऐवजी आपला मोर्चा वेण्णालेककडे वळविला वेण्णालेक येथे वाहनाचा शोध घेत असताना संशयित आरोपींची गाडी महाबळेश्वरकेडे गेल्याचे पोलिस पथकाने पाहीले, व त्यांनी त्या वाहनाचा पाठलाग सुरू केला काही पोलिस कर्मचारी दुचाकीवर होते ते ताडीने आरोपींच्या वाहनामागे गेले आरोपी हे येथील दि क्बल येथील चौकात पोहचले तेव्हा दुचाकीवर असलेल्या पोलिस कर्मचारी यांनी आपले सर्विस पिस्टल काढुन हातात घेतले व दुचाकी आरोपींच्या वाहनाला आडवी लावली दुचाकी आडवी लावत असताना मागील पोलिस अधिकारी यांनी आपल्याकडील सर्विस पिस्टल आरोपींवर रोखले दरम्यान चारचाकी मधील पोलिस पथकही घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी चालल्या वाहनातुन बाहेर पडून आरोपींच्या गाडीला घेरले,
काही क्षणांचा हा थरार आरोपींच्या वाहनात असलेल्या गाईड सुरेश उगले याने सांगितला. पोलिसांनी आपल्या गाडीस घेरल्याचे पाहताच सर्वच आरोपींनी आपला खेळ संपला असल्याचे समजले, त्यानंतर पोलिसांनी वाहनतळावर आरोपींची झडती घेतली. परंतु त्यांचेकडे कोणतेही हत्यार आढळुन आले नाही मात्र त्यांच्या जवळ 50 हजार रूपये रोख रक्कम सापडली तसेच गाडीच्या डिक्कीत रोकड भरून ठेवण्याच्या रिकाम्या तीन पिशव्या व एक मोठी बॅग आढळुन आली ते कोणत्या हॉटेलवर उतरले आहेत याची चैकशी सुरू केली परंतु ते काही हॉटेलचे नाव सांगत नव्हते. तेव्हा त्यांच्या बरोबर असलेल्या गाईडकडे पोलिसांनी चौकशी केली असता गाईडने हॉटेलचे नाव सांगितले. पोलिस पथकाने सर्व आरोपींना हॉटेलवर चौकशीसाठी नेले तेथे अरोपिंच्या सामानात दोन लाख पन्नास हजार रूपये सापडले.
नागपूर येथून मिळालेली माहिती अशी की छत्तीसगढ मधील रायपुर येथील मॅपल ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा मालक खजान ठक्कर हे हवालाची रक्कम पोहचविण्याचे काम करतात. त्यासाठी त्यांनी आपल्या वाहनात रक्कम लपविण्यासाठी तशी सोय केली होती. अशीच एक डस्टर गाडी हवालाची 5 कोटी 73 लाख रूपये रायपुर येथुन नागपुरला एका ठिकाणी येत असल्याची माहीती नागपुर येथील अट्ट्ल गुन्हेगार सचिन उर्फ शशांक व त्यांचा मित्र रवि यांनी नागपुर नंदनवन पोलिस ठाण्याचे अधिकारी यांना दिली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे नागपुर पोलिसांनी प्रजापती चौकात हवाला रक्कम असलेली डस्टर गाडी क्र एम एच 31एफ ए 4611 पकडली या गाडीतील दोन व्यक्तींना ताब्यात घेवुन पोलिस वाहनात बसविले व हवालाची रक्कमेसह पकडलेल्या गाडीत तीन पोलिस कर्मचारी व या गाडीची खबर देणारे रवि व सचिन असे पाच जण बसले प्रजापती चौकातुन नंदनवन पोलिस ठाणे हे आठ मिनिटांच्या अंतरावर आहे परंतु ही गाडी 45 मिनीटांनी पोलिस ठाण्यात पोहचली या 45 मिनीटात गाडीतील हवालाची रक्कम असेलेल्या पाच कंपार्टमेंट पैकी एक कंपार्टमेंट रिकामे दिसुन आले व वाहनात बसलेले दोन खबरी बेपत्ता झाले होते. जेव्हा हवाला रक्कम असलेली गाडी पोलिस ठाण्यात आली तेव्हा गाडीतुन आडीच कोटी बेपत्ता असल्याची तक्रार खजान ठक्कर यांनी पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीमुळे नागपुरचे तीन पोलिस कर्मचारी हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या प्रकरणी सबंधित आरोपींवर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागातील पोलिस पथकात पोलिस निरिक्षक पद्माकर घनवट, विकास जाधव, प्रसन्न जराड, सुरेंद्र पानसांडे, प्रविण फडतरे, मारूती लाटणे तर शाहुपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रविण गोरे, अमित माने, मोहन पवार, लक्ष्मण बुधावले यांचा समावेश होता.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |