11:02pm | Apr 01, 2018 |
साताराः फलटण नगर पालिकेच्या पाणी पुरवठा टप्पा क्रमांक ५ चे काम पुर्ण करताना करण्यात आलेल्या गौण खनिजाची तब्बल १ लाख ३४ हजार ब्रासची रॉयल्टी बुडविण्यासह गौण खनिजाची परस्पर विक्री केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने तात्काळ चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारयांना दिले आहेत. या घोटाळयाची व्याप्ती कोट्यावधी रुपयांची असून राजकीय दबाव झूगारून पारदर्शकपणे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी फलटण तालुका संघर्ष समितीच्या पदाधिकारयांनी केली.
सातार्यात आयोजित पत्रकार परिषेद ते बोलत होते. यावेळी अॅड. नरसिंह निकम, याचिकाकर्ते व माजी नगरसेवक सुरेश उर्फ नंदु पवार, सुरेश देशपांडे, अॅड अनिल फाळके उपस्थित होते.
पाणी पुरवठा टप्पा क्रमांक ५ साठी 'आयव्हीआरसीएल' कंपनीने १ लाख ३४ हजार ब्रासचे उत्खनन केले. उत्खनन् करताना शासनाकडे गौण खनिजाची २ कोटी ६९ लाख कोटी रुपये भरणे आवश्यक होते. मात्र कोणतीही रॉयल्टी भरली नाही उलट १३ कोटी ५० कोटी रुपयांचा दगड मुरुम व माती परस्पर विकण्यात आली. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे निदर्शनास आल्याने माजी नगरसेवक सुरेश पवार यांनी तहसिलदार, प्रांत व जिल्हाधिकारयांकडे तक्रार अर्ज दाखल करुन चौकशी करण्याची मागणी केली तसेच पाच दिवस उपोषण ही केले. मात्र प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.
त्यामुळे अखेर पवार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन कार्यवाही करण्याची मागणी केली. न्या.श्रीमती प्रभुदेसाई व मोरे सो. खंडपिठासमोर सुनावणी झाली. सुनावणीअखेर न्यायालयाने जिल्हाधिकारयांनी गौण खनिज प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हाधिकारयांनी ठेकेदार, नगरपालिका मुख्याधिकारी, तत्कालिन न.प.उपअभियंता, प्रांताधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना देण्यात आले आहेत. या प्रकरणी दि. ५ एप्रिल रोजी सुनावणी साठी उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
मात्र या चौकशीत राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता असून जिल्हाधिकारयांनी न्यायालयाच्या आदेशानुसार तात्काळ व पारदर्शकपणे चौकशी करून घोटाळा करणारयांवर गुन्हे दाखल करून रक्कम वसूल करावी, अशी मागणी यावेळी अॅड.निकम यांनी केली.
जिल्हा प्रशासन सभापतींच्या दबावाखाली
फलटण नगरपालिकेवर विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजेना.निंबाळकर यांची सत्ता आहे. तसेच त्यांचे बंधु रघुनाथराजे ना.निंबाळकर हे नगराध्यक्ष असताना गौण खनिज घोटाळा झाला आहे. त्यामुळे वेळोवेळी दाद मागून आणि उपोषण करुन ही प्रशासनाने कारवाई केली नाही. मात्र आता उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारयांना चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र तरी ही प्रशासन राजकीय दबावात असल्याप्रमाणे चौकशीची कार्यवाही करत आहे, असा आरोप संघर्ष समितीच्या पदाधिकारयांनी केला.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |